जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Pregnancy Diet & Precautions : प्रेग्नेंट झाल्यावर 'या' गोष्टी टाळा, अन्यथा बाळावर होईल गंभीर परिणाम

Pregnancy Diet & Precautions : प्रेग्नेंट झाल्यावर 'या' गोष्टी टाळा, अन्यथा बाळावर होईल गंभीर परिणाम

Pregnancy Diet & Precautions : प्रेग्नेंट झाल्यावर 'या' गोष्टी टाळा, अन्यथा बाळावर होईल गंभीर परिणाम

गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. महिलांनी गरोदरपणात कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबद्दल जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, २२ जुलै : प्रत्येक महिलेसाठी गर्भावस्थेचा (Pregnancy) काळ विशेष महत्त्वाचा असतो. या काळात महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यामुळे गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यांनी त्यांचा आहार आणि जीवनशैली आरोग्यासाठी उत्तम असेल, याचीही काळजी घ्यायला हवी. रोजचा आहार, शारीरिक हालचाली, ताणतणाव, हॉर्मोनल बदल (Hormonal Changes) या बाबींचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी गरोदरपणात आरोग्याची काळजी घ्यायला हवी. महत्त्वाचं म्हणजे चांगल्या जीवनशैलीमुळे गर्भातल्या बाळाच्या वाढीवर बरेच चांगले परिणाम होतात आणि चांगल्या सवयींमुळे बाळ निरोगी राहतं. स्त्रिया गरोदरपणात त्यांची दैनंदिन कामं चालू ठेवू शकतात. आरोग्य उत्तम असेल, तर कामात बदल करण्याची कोणतीही गरज नसते. त्यांना फक्त त्यांच्या जीवनशैलीत (Lifestyle) काही बदल करावे लागतात. तसंच काही पदार्थ खाणं टाळावं. या गोष्टी न केल्यास त्यांच्या आणि गर्भातल्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. महिलांनी गरोदरपणात कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबद्दल जाणून घेऊ या. या संदर्भात माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने प्रसिद्ध केलं आहे. कॅफिनचं (caffeine) मोठ्या प्रमाणावर सेवनl चहा-कॉफीमध्ये कॅफिन असतं. कॅफिनमुळे गर्भावर परिणाम होऊ शकतो. गर्भवती महिलांच्या पोटात दररोज 300 मिलीग्रामपेक्षा अधिक प्रमाणात कॅफिन जाऊ नये, असा सल्ला संशोधक देतात. कॅफिनयुक्त पेयांचा अतिरेक गर्भासाठी हानिकारक असून तो बाळाला हानी पोहोचवू शकतो. काही तज्ज्ञांच्या मते, गर्भवती महिलांनी रोज दीड कपापेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. दारू पिणं टाळावं गर्भवती महिलांनी दारू (alcohol) पिणं धोकादायक ठरू शकतं. एखादी गर्भवती महिला जेव्हा दारू पिते, तेव्हा ती गर्भावर परिणाम करू शकते. त्यामुळे गर्भाला अल्कोहोल सिंड्रोमदेखील होऊ शकतो. याशिवाय इतर समस्याही उद्भवू शकतात. दारू प्यायल्याने बाळामध्ये शारीरिक अपंगत्व, मेंदू पूर्णपणे विकसित न होणे आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बाळाच्या वाढीस वेळ लागू शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी दारू पिऊ नये. काही प्रकारचे व्यायाम डॉक्टर गर्भधारणेदरम्यान व्यायाम करण्याची शिफारस करतात, परंतु ते विशिष्ट प्रकारच्या व्यायामास मनाईदेखील करतात. गर्भवती महिलांनी जम्पिंग एक्सरसाइज, धक्का बसेल असा व्यायाम करू नये. तसंच पहिल्या तीन महिन्यांनंतर सिटअप्स, क्रंच्ससारखे व्यायाम आणि हेवी लिफ्टिंग करणं टाळावं. गरोदरपणात चालणं, पोहणं आणि स्क्वॅटिंग करणं फायदेशीर ठरू शकतं; पण कोणता व्यायाम करावा आणि कोणता नाही, याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हॉट बाथ आणि ओव्हरहीटिंग गरम पाण्यात आराम केल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने गरोदरपणातली अस्वस्थता कमी होऊ शकते. परंतु तज्ज्ञ हॉट टब बाथ (Hot tub bath) टाळण्याचा सल्ला देतात. अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या माहितीनुसार, गरम टब बाथमुळे हायपरथर्मिया (Hyperthermia) किंवा शरीराचे तापमान खूप वाढतं. त्यामुळे बाळामध्ये अनेक विकृती निर्माण होऊ शकतात, त्यामुळे गर्भधारणा झालेली असताना हॉट योगा किंवा पिलेट्स, जास्त वेळ उन्हात बसणं, जास्त गरम ठिकाणी बसणं टाळा. तसंच डिहायड्रेशन (dehydration) होणार नाही याची काळजी घ्या. कॉन्ट्रॅक्ट गेम्स (Contract games) ‘अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्स’ने दिलेल्या सल्ल्यानुसार, गर्भवती महिलांनी फुटबॉल किंवा बॉक्सिंगसारखे खेळ खेळणं टाळावं. यामुळे बाळाचा अकाली जन्म होणं किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. धोकादायक राइड्स टाळा (Avoid dangerous rides) म्युझियम पार्कमध्ये जाणाऱ्या व्यक्ती तिथे अनेक प्रकारच्या राइड्सही करतात. गर्भवती महिलांनी रोलर कोस्टर किंवा इतर कोणतीही धोकादायक राइड टाळावी. त्यामुळे महिलेसह बाळालाही धोका निर्माण होऊ शकतो. धूम्रपान गर्भधारणेदरम्यान सिगारेट ओढल्याने महिला आणि गर्भातलं बाळ या दोघांनाही हानी पोहोचते. यामुळे हृदयविकार (Heart Attack) आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका तर वाढतोच, शिवाय गरोदरपणात धूम्रपान (Smoking) केल्याने बाळाचा वेळेआधी जन्म होऊ शकतो, बाळात जन्मजात विकृती होऊ शकते, त्याचा अचानक मृत्यू होऊ शकतो किंवा प्लासेंटाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी धूम्रपान करू नये आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींशी संपर्कही टाळला पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात