Home /News /lifestyle /

Beer सह खाताय का हे पदार्थ? असं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी ठरेल अत्यंत घातक

Beer सह खाताय का हे पदार्थ? असं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी ठरेल अत्यंत घातक

बहुतेक लोक बिअरसोबत काहीही खाताना आणि पिताना दिसतात. पार्ट्यांमध्ये बिअरसोबत पिझ्झा, चिकन, भजी, तळलेले ड्रायफ्रुट्स यासारखे पदार्थ सर्व्ह केले जातात. बिअरसोबत हे पदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: कुठलाही लहान-मोठा प्रसंग असो बहुतेकजण अतिशय सहजपणे बिअर पितात. बिअर हे जगातील सर्वात जुनं आणि सर्वाधिक प्रमाणात सेवन केलं जाणारं अल्कोहोलिक ड्रिंक (Alcoholic drink) आहे. पाणी आणि चहानंतर तिसरे सर्वांत लोकप्रिय ड्रिंक म्हणून बिअरकडे पाहिलं जातं. आजकाल तर बिअरशिवाय कुठलीही पार्टी अपूर्ण समजली जाते. कारण, बिअर पिणं हा मॉडर्न लाईफस्टाईलचा (Modern Lifestyle) एक महत्त्वाचा भाग मानला जाऊ लागला आहे. इतर अल्कोहोलच्या तुलनेत त्यात कमी नशा असते. त्यामुळं बिअरचा खपही वाढला आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास ती आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र, जास्त प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीनं बिअर प्यायल्यास ती तितकीच धोकादायकदेखील (ठरू शकते. बहुतेक लोक बिअरसोबत काहीही खाताना आणि पिताना दिसतात. पार्ट्यांमध्ये बिअरसोबत पिझ्झा, चिकन, भजी, तळलेले ड्रायफ्रुट्स यासारखे पदार्थ सर्व्ह केले जातात. बिअरसोबत हे पदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. बिअर-डार्क चॉकलेट हे कॉम्बिनेशन पोटासाठी घातक डार्क चॉकलेट (Dark Chocolate with beer) हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण, जर ते बिअरसोबत खाल्ल्यास समस्या उद्भवू शकतात. इतर अॅसिडिक पदार्थांप्रमाणेच चॉकलेटमध्ये कॅफीन (Caffeine), फॅट आणि कोको हे घटक असतात. बिअरसोबत डॉर्क चॉकलेट खाल्ल्यानं गॅस्ट्रोइंटेस्टीइनल (Gastrointestinal) समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बिअर आणि डार्क चॉकलेटचं कॉम्बिनेशन टाळावं. हे वाचा-Diabetes, Hypertension चा धोका भारतीयांमध्ये अधिक, संशोधनातून समोर आलं हे कारण मसालेदार पदार्थ बिअरसोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं आनंद मिळतो. त्यामुळे बिअर पिताना सर्रासपणे मसालेदार पदार्थ (Spicy foods with beer is harmful) खाल्ले जातात. पण हे पदार्थ सोबत खाणं म्हणजे आरोग्यासोबत खेळ खेळल्यासारखं आहे. मसालेदार पदार्थांमध्ये कॅप्सिसीन (Capsaicin) असतं ज्यामुळं पोटात जळजळ आणि इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे घातक कॉम्बिनेशन टाळलं पाहिजे. ब्रेड किंवा ब्रेडपासून तयार केलेले पदार्थ टाळा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, बिअरसोबत ब्रेडपासून (Bread with beer) बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नये. कारण दोन्ही गोष्टींमध्ये यीस्ट (Yeast) असतं. आपलं पोट एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात यीस्ट पचवू शकत नाही. जर ब्रेड आणि बिअर सोबत खाल्लं तर पचनाची किंवा कँडिडा (Candida) वाढण्याची समस्या होऊ शकते. फरसाणसोबत बिअर पिऊ नका बर्‍याच लोकांना बिअरसोबत खारे शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स किंवा इतर प्रकारचे स्नॅक्स खायला आवडतात. या गोष्टींमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. इतकंच नाही तर या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला एडिमा (Edema) आणि ब्लड प्रेशरचा धोकाही वाढू शकतो. हे वाचा-पालक खाण्याचा अतिरेक तर होत नाही ना? चांगल्या आरोग्यासाठी इतकं प्रमाण पुरेसं बर्गर आणि फ्रेंच फ्राईज टाळा बिअरसोबत बर्गर, फ्रेंच फ्राईजसारखे पदार्थ खाऊ नका. या स्नॅक्समध्ये जास्त प्रमाणात सोडियम असतं. जर अल्कोहोलसोबत स्नॅक्स (Snacks) पोटात गेल्यास पचनसंस्थेसाठी घातक ठरू शकतात. खारट गोष्टी तुमची तहान वाढवतात ज्यामुळे तुम्ही जास्त पिता. याशिवाय बिअरमध्येही लघवीचं प्रमाण वाढवणारे घटक असतात. त्यामुळे वारंवार लघवी होते. एकूणचं, बिअर किंवा दारू पिण्याचे काही नियम आहेत. वाईन (Wine) आणि बिअरचं मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास शरीर तंदुरुस्त राहतं, असे अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. त्याचबरोबर रिकाम्या पोटी अल्कोहोल घेणं किंवा चुकीचे पद्धतीनं ते घेणं तुम्हाला आजारी पाडू शकतं. त्यामुळे डिहायड्रेशन (Dehydration) आणि डोकेदुखीसारख्या समस्यादेखील जाणवू शकतात. म्हणून अल्कोहोल घेताना काही नियमांचं पालन केलं पाहिजे.
First published:

Tags: Alcohol, Beer, Health, Lifestyle, Wellness

पुढील बातम्या