Home /News /lifestyle /

Diabetes, Hypertension चा धोका भारतीयांमध्ये अधिक, संशोधनातून समोर आलं हे कारण

Diabetes, Hypertension चा धोका भारतीयांमध्ये अधिक, संशोधनातून समोर आलं हे कारण

गेल्या काही वर्षांत आरोग्यविषयक समस्या वाढल्याचं दिसून येत आहे. डायबेटीस (Diabetes), हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack), हायपरटेन्शन (Hypertension) आदी विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतीयांमध्ये या आजारांचा धोका अधिक आहे

पुढे वाचा ...
मुंबई, 03 फेब्रुवारी: गेल्या काही वर्षांत आरोग्यविषयक समस्या वाढल्याचं दिसून येत आहे. डायबेटीस (Diabetes), हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack), हायपरटेन्शन (Hypertension) आदी विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अर्थात यामागे बदलती जीवनशैली (Changing Lifestyle), व्यायामाचा आणि पोषक आहाराचा अभाव, वाढते ताण-तणाव आदी कारणं असल्याचं सांगितलं जातं. अशा विविध आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर सातत्याने संशोधन होत आहे. तसंच त्यावरची उपचारपद्धतीदेखील संशोधनाच्या माध्यमातून विकसित होत आहे. परंतु, तरीदेखील दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येते. पूर्वी वयस्कर व्यक्तींमध्ये दिसून येणारे आजार आता कमी वयाच्या व्यक्तींमध्येही दिसून येत आहेत. डायबेटीस आणि हृदयविकारग्रस्त तरुणांची संख्या आता लक्षणीय झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयआयटी मद्रासच्या (IIT Madras) संशोधकांनी केलेलं संशोधन महत्त्वाचं ठरतं. भारतीय, तसंच इतर दक्षिण आशियाई (South Asia) नागरिकांमध्ये डायबेटीस, हार्ट अ‍ॅटॅक आणि हायपरटेन्शनचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्रोटीनचा (Protein) विशेष अभ्यास या आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने केला असून, काही निष्कर्षदेखील मांडले आहेत. हे विकार होण्यामागे एक विशिष्ट जनुकीय रचना कारणीभूत असल्याचं या संशोधकांचं म्हणणं आहे. हे वाचा-पालक खाण्याचा अतिरेक तर होत नाही ना? चांगल्या आरोग्यासाठी इतकं प्रमाण पुरेसं आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखालच्या आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने प्रोटीनच्या जनुकामधलं असं म्युटेशन (Mutation) शोधून काढलं आहे, की जे भारतीय, तसंच इतर दक्षिण आशियाई नागरिकांमध्ये डायबेटीस, हार्ट अ‍ॅटॅक आणि हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरतं. असं 15 टक्के भारतीयांमध्ये आढळत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. कोणत्याही आजारासाठी पर्यावरणीय कारणांव्यतिरिक्त आपली जनुकीय संरचनादेखील कारणीभूत ठरू शकते. क्रोमोग्रॅनिन प्रोटिनच्या आनुवंशिक रचनेतला फरक डायबेटीस, हार्ट अ‍ॅटॅक आणि हायपरटेन्शनचा धोका वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, असं संशोधनात दिसून आल्याचं संशोधकांनी सांगितलं. हे वाचा-सुटत चाललेलं पोट वेळीच आणा नियंत्रणात; या 6 सोप्या पद्धती ठरतील प्रभावी ज्या व्यक्तींमध्ये प्रोटिनचं आनुवंशिक स्वरूप वेगळं असतं, अशा व्यक्तींना डायबेटीस, हार्ट अ‍ॅटॅक आणि हायपरटेन्शन हे आजार होण्याचा धोका दीड पटीने वाढतो. या संशोधकांच्या पथकात सहभागी असलेले प्राध्यापक नितीश महापात्रा यांनी सांगितलं, की 'दक्षिण आशियातल्या नागरिकांना हृदयरोगासह, अन्य आजारांचा धोका जास्त असतो. यासाठी हे प्रोटीन कारणीभूत आहे.' या संशोधनामुळे डायबेटीस, हायपरटेन्शन आणि हार्ट अ‍ॅटॅक या आजारांवरच्या उपचार पद्धतीसाठी एक नवी दिशा मिळू शकते.
First published:

Tags: Diabetes, Health, Heart Attack, Heart risk, Lifestyle, Stress, Wellness

पुढील बातम्या