नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : हिवाळ्यामध्ये अनेकजण पालकची (Spinach) भाजी खायला प्राधान्य देतात. पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. कारण, त्यात पोषक घटक जास्त असतात. पालक खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य तर सुधारतेच पण रक्तदाबही नियंत्रणात राहतो. याशिवाय पालक ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून हाडे मजबूत करण्यास मदत करतो. पालक आरोग्यासाठी वरदान ठरत असला तरी जास्त प्रमाणात खाणं त्रासदायक ठरू शकतं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, पालक जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.
पालक स्मूदी बनवून ते पिऊ शकता. पालक करी बनवू शकता. तुम्ही ते ऑम्लेटमध्ये टाकून किंवा मसूर किंवा इतर कोणत्याही भाजीत मिसळून खाऊ शकता. येथे जाणून घेऊया की, जर आपण पालक जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होऊ शकते आणि कोणत्या लोकांनी (Side Effects Of Spinach) खाणे टाळावे.
पोषक तत्वांची कमतरता उद्भवू शकते
पालकामध्ये पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतात, परंतु त्यामध्ये असलेले ऑक्सॅलिक अॅसिड हे वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे घटक आहे. जेव्हा शरीरात या घटकाचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा शरीरातील इतर खनिजे शोषून घेण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. ऑक्सॅलिक अॅसिड जस्त, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमशी एकत्र येते, ज्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता होऊ शकते आणि आरोग्य बिघडू शकते.
शरीरात थकवा
पालक दिवसभरात जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात थकवा येऊ शकतो. पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीची उर्जा कमी होते आणि दिवसभर सुस्ती येत राहते.
पोटाच्या समस्या
पालकमध्ये भरपूर फायबर आढळते. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पालकामुळे पोटात गॅस, पोट फुगणे आणि पेटके येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय, त्याचा पचनावरही परिणाम होतो.
अॅलर्जी असण्याची शक्यता
पालकसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिस्टामाइन असते. हिस्टामाइन हे शरीराच्या काही पेशींमध्ये आढळणारे रसायन आहे, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये अॅलर्जी होऊ शकते आणि शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
हे वाचा -
Hair care: कोंडा आणि कोरड्या केसांचं कारण तुमच्या केस धुण्यात तर नाही ना? ही योग्य पद्धत वापरा
या लोकांसाठी पालकचे सेवन धोकादायक ठरू शकते
किडनी स्टोनची समस्या असल्यास पालक खाऊ नका
ज्या लोकांना किडनी स्टोन आहे, त्यांना पालक न खाण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, अधिक पालक खाल्ल्याने शरीरात अधिक ऑक्सॅलिक अॅसिड तयार होते. अशा परिस्थितीत, शरीराला प्रणालीतून बाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन जमा होऊ लागतो, जो किडनीमध्ये स्टोनची समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरतो.
सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी पालक खाऊ नये
ऑक्सॅलिक अॅसिडसोबत पालकमध्ये प्युरीन देखील असते, जो एक प्रकारचा घटक आहे. हे दोन घटक एकत्रितपणे संधिरोगास उत्तेजन देऊ शकतात. ज्यांना आधीच सांधेदुखी आणि सूज येण्यास त्रास होत आहे त्यांच्यासाठी पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.
हे वाचा -
Spinach Juice Benefits: पालकचा रस या 6 आजारासाठी आहे विशेष गुणकारी, जाणून घ्या हिवाळ्यातील फायदे
मधुमेही रुग्णांनी पालक खाऊ नये
पालकामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, जी रक्त पातळ करणाऱ्या औषधावर प्रतिक्रिया देतात. त्यामुळे जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, मधुमेही असाल किंवा किडनी स्टोनचा धोका असेल तर पालक खाणे टाळावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.