Home /News /maharashtra /

राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; गेल्या 10 दिवसांत 415462 कोरोनामुक्त, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती

राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; गेल्या 10 दिवसांत 415462 कोरोनामुक्त, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती

Maharashtra Covid 19 statistics: राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

  मुंबई, 26 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात (Coronavirus in Maharashtra) थैमान घातले होते. या कोरोना विषाणूची (Coronavirus) लाट आता ओसरत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासूनच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ (discharged number increasing) होत आहे. यामुळे आता राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचं दिसत आहे. राज्यात आज 23065 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 52,41,833 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 92.76 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 24,752 नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या 315042 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 10 दिवसांत राज्यात एकूण 415462 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान? ठाणे मंडळ - 3871 नाशिक मंडळ - 3634 पुणे मंडळ - 6004 कोल्हापूर मंडळ - 4694 औरंगाबाद मंडळ - 1095 लातूर मंडळ - 1269 अकोला मंडळ - 2619 नागपूर मंडळ - 1566 एकूण - 24752 गेल्या 10 दिवसांतील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 26 मे - 23,065 25 मे- 36,176 24 मे- 42,320 23 मे - 29,177 22 मे - 40,294 21 मे - 44,493 20 मे - 47,371 19 मे - 51,457 18 मे - 52,898 17 मे - 48,211 अंत्यसंस्कारला कोणीच आलं नाही, एकट्या मुलीने केलं सगळं! पण श्राद्धाला मात्र 150 हजर राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील
  अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
  मुंबई७००३४०६५५४८४१४६८४२०९८२८०७४
  ठाणे५५९३१९५२९२७७८०६२३१२१९४९
  पालघर११२६८८१०२७९११७४३१२८१४२
  रायगड१४५७३२१३७४५४२७४९५५२७
  रत्नागिरी४१४८७३५३५८९३७५१९०
  सिंधुदुर्ग२३७८११८८९५६०७११४२६८
  पुणे१००६८२१९४९१४०११९६६६०४५६५५
  सातारा१५४६९९१३१८५७२८६९१५१९९५८
  सांगली१२०३७५१०२६५८२८०८१४९०६
  १०कोल्हापूर१०४५७५८४३८२३२२८१६९६२
  ११सोलापूर१५७३२११३८४३१३९६०७०१४८६०
  १२नाशिक३८२१९६३६३७६९४४६५१३९६१
  १३अहमदनगर२४५३८९२२९४४०२८६६१३०८२
  १४जळगाव१३५९६७१२५८७३२३३१३२७७३१
  १५नंदूरबार३८६००३६७९६७९९१००२
  १६धुळे४४४१२४१३२१५०९१२२५७०
  १७औरंगाबाद१४५४८११३७२७४२७००१४५४९३
  १८जालना५७५१५५१९२४९०१४६८९
  १९बीड८४६४३७३८८११८१६८९३८
  २०लातूर८८४७९८२५८५१६१५४२७५
  २१परभणी४९९३२४४२६७९११११४७४३
  २२हिंगोली१७५४११५०९४३२४२१२३
  २३नांदेड८९२६१८३२६६२१५७३८३१
  २४उस्मानाबाद५५९७९५०००४१२७६६३४६३६
  २५अमरावती८७७०२७८२७२१३५८८०७०
  २६अकोला५५०६०४८१६८८७१६०१७
  २७वाशिम३८७४७३५३३८५४९२८५७
  २८बुलढाणा७८४४०७३६८१४६६४२८८
  २९यवतमाळ७१७००६७३०६१३३३३०५७
  ३०नागपूर४८७९९०४६६२६३६४७४५२१५२०१
  ३१वर्धा५७०४७५२२४४८७८११२३८१३
  ३२भंडारा५८७३९५६२३१८१५१६८४
  ३३गोंदिया३९७७५३७९७४४३३१३६१
  ३४चंद्रपूर८५१३०७९१८०१३५९४५८९
  ३५गडचिरोली२७८९८२५९५५४०४२५१५१४
  इतर राज्ये/ देश१४६११८२६
  एकूण५६५०९०७५२४१८३३९१३४१२६९१३१५०४२
  राज्यात आज 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 323 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 130 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.62 टक्के इतका झाला आहे.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai

  पुढील बातम्या