मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सकाळी उठल्यानंतर तुमच्याही पाठीत कळ येते का? दुर्लक्ष केल्यास येऊ शकतं अपंगत्व

सकाळी उठल्यानंतर तुमच्याही पाठीत कळ येते का? दुर्लक्ष केल्यास येऊ शकतं अपंगत्व

कामाच्या त्रासामुळे ही पाठदुखी (back pain) होत असेल असं समजून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हे दुखणं अंगावरच काढलं जातं.

कामाच्या त्रासामुळे ही पाठदुखी (back pain) होत असेल असं समजून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हे दुखणं अंगावरच काढलं जातं.

कामाच्या त्रासामुळे ही पाठदुखी (back pain) होत असेल असं समजून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हे दुखणं अंगावरच काढलं जातं.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 24 सप्टेंबर : कविता एक गृहिणी आहे. गेली कित्येक वर्षांपासून तिला पाठदुखीची (back pain) समस्या होती. 2o12 साली पहिल्यांदाच सकाळी उठल्यानंतर बराच वेळ तिच्या पाठीत तीव्र वेदना (back pain) होऊ लागल्या. त्यानंतर घरातील कामामुळे पाठदुखी होत असावी, असं समजून कित्येक वर्षे तिनं हे दुखणं अंगावरच काढलं. घरच्या घरीच मलम लावून, पेनकिलर घेऊन त्यावर उपचार केले. मात्र एक दिवस तर तिला सकाळी अंथरूणातून उठताही येईल. समस्या अधिकच वाढल्याने तिनं आपली तपासणी करून घेतली. 2018 साली तिला अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (ankylosing spondylitis) असल्याचं निदान झालं. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायसिस (एएस) ही स्थिती ऑटोइम्युन म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जेव्हा अतिसक्रिय होते आणि निरोगी पेशींवरच हल्ला करते तेव्हा उद्भवते. दर 500 प्रौढ व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला ही समस्या उद्भवते. योग्य काळजी घेतली नाही तर त्यातून मणक्याच्या हाडांवर परिणाम होण्याची भीती असते. असह्य वेदना, ताठरपणा जाणवणं, शरीराच्या विविध भागांना, पाठ, नितंब आणि मांड्या  अशा भागांना विशेषत: सकाळच्या वेळी किंवा खूप वेळ बसल्यास सूज येणं ही याची लक्षणं आहेत. पुरुषांना साधारणपणे पाठीच्या खालच्या भागाचं दुखण विशेषत: आजाराच्या सुरुवातीच्या काळात जाणवतं. तर स्त्री रुग्णांना मात्र सोरिअॅटिक आर्थ्ररायटिस, पेरिफेरल आणि सर्व्हायकल सांध्यांमध्ये सूज येणं असे त्रासही जाणवू शकतात. कालांतराने यातून सोरायसिसचा त्रासही सुरू होऊ शकतो. हे वाचा - सूर्यग्रहणात जे जे करू नये तेच सर्व गर्भवतीने केलं आणि... या आजाराचं निश्चित कारण अद्यापही पूर्णपणे समजलेलं नाही. यात जनुकीय रचनेची काही भूमिका जरूर असते. एएसचा त्रास असलेल्या बहुतांश लोकांमध्ये एचएलए-बी27 नावाचं एक जनुक सापडतं.  अनेकदा कामामुळे उद्भवणारी पाठदुखी म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. तर बऱ्याच वेळा ऑस्टिओआर्थ्रायटीस, स्लिप्ड डिस्क (सायटिका) आणि फायब्रोमायाल्जिया अशा पाठीच्या मणक्याशी संबंधित समस्या असल्याचं निदान केलं जातं आणि मग उपचारांना उशीर होऊ शकतो. निदानाला उशीर होणं किंवा चुकीचं निदान होणं या गोष्टी एएसचा त्रास असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत जास्त प्रमाणात घडताना दिसतात. स्त्रियांना वेदना अधिक प्रमाणात जाणवत असल्या तरीही त्यामुळे झालेली प्रत्यक्ष हानी ही एक्स-रे, एमआरआयमधून पुरुषांच्या तुलनेत कमी प्रमाणात दिसते आणि मग स्त्रियांचं जीवनमान पुरुषांपेक्षा खूपच जास्त खालावत जाते. त्यांच्या पाठीच्या मणक्याला रचनात्मक इजा पोहोचू शकते आणि त्यातून अपंगत्व येऊ शकतं. हे वाचा - कोरोनाची लक्षणं म्हणून रुग्णालयात नेलं; छातीत होता फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर एएससाठीच्या उपचारांचे पर्याय आणि पद्धती स्त्री-पुरुष दोघांसाठीही सारख्याच आहेत. ज्यात एनएसएआयडीज आणि फिजिओथेरपीपासून सुरुवात केली जाते. ज्या रुग्णांचे दुखणं सुरुवातीचे उपचार घेऊन बरे होत नाहीत, अशा रुग्णांना अशी औषधं दिली जातात जी आपल्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विशिष्ट भागाला लक्ष्य करतात. त्यामुळे 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ पाठदुखी असेल आणि वरील लक्षणं जाणवत असतील, तर योग्य निदान आणि उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून दीर्घकालीन अपंगत्वाची स्थिती टाळता येईल, असं आवाहन indian rheumatology association चे सदस्य आणि मुंबई आर्थ्ररायटीस क्लिनिकचे रूमेटोलॉजिस्ट डॉ. शशांक अकेरकर यांनी केलं आहे.
First published:

Tags: Health, Pain, Serious diseases

पुढील बातम्या