Home /News /lifestyle /

कोरोनाची लक्षणं म्हणून रुग्णालयात नेलं; छातीत होता फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर

कोरोनाची लक्षणं म्हणून रुग्णालयात नेलं; छातीत होता फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर

मुलाला खोकला, श्वास घ्यायला त्रास अशा कोरोनाच्या लक्षणांसह छातीत वेदना होत होत्या आणि दमही लागत होता.

    मुंबई, 23 सप्टेंबर : खोकला, श्वास घ्यायला त्रास मुंबईतील 15 वर्षांच्या मुलामध्ये दिसू लागली. त्याला कोरोना तर झाला नाही ना या भीतीने त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. तिथं त्याच्या काही चाचण्या करण्यात आला. त्याला कोरोना नाही तर त्याच्या छातीत तब्बल फुटबॉलच्या आकाराची गाठ (tumor) होती. भायखळात राहणारा प्रतीक बरकडेमध्ये कोरोनासारखी लक्षणं दिसत होती. शिवाय त्याच्या वेदना होत होत्या आणि दमही लागत होता. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या छातीच्या सीटीस्कॅन केला. यामध्ये त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला एक भलीमोठी गाठ होती. फुफ्फुसामध्ये ही गाठ होती. याला वैद्यकीय भाषेत सॉलिटरी फ्रायबर ट्युमर म्हटलं जातं. मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांनी सांगितलं, "सध्या कोरोनाच्या भीतीपायी अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येणं टाळत आहेत. अशाच भीतीमुळे प्रतीकवरही वेळेत उपचार झाले नाहीत आणि हा ट्युमर वाढत गेला. जो फुटबॉलच्या आकाराइतका मोठा झाला होता. या गाठीमुळे फुफ्फुसं, श्वसननलिका आणि हदयावर विपरित परिणाम होऊ लागला होता" हे वाचा - फक्त इंजेक्शन नाही तर नाकावाटेही देणार कोरोना लस; पुण्याच्या 'सीरम'कडून उत्पादन शस्त्रक्रिया करून ही गाठ काढणं हा एकच मार्ग होता. प्रतीकवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि गाठ काढण्यात आली. 16 सेंटीमीटर आकाराची ही गाठ ज्याचं वजन तब्बल 1.5 किलो होतं. "फुफ्फुसात आढळून येणारे हे ट्यूमर अतिशय दुर्मिळ असते. धुरामुळे होणाऱ्या संसर्गामुळे हा त्रास उद्भवू शकतो. यावर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय आहे" असं डॉ. भालेराव यांनी सांगितलं. हे वाचा - हिरड्या आणि नाकातून होणारा रक्तस्राव थांबवण्यास उपयुक्त आहे डाळिंब शस्त्रक्रियेनंतर प्रतीकच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. तो आता सामान्य आयुष्य जगू लागला आहे, अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली. प्रतीकचे वडील मयूर बरकडे म्हणाले, "आमच्या मुलाला श्वास आणि खोकला येत होता पण त्यामागील कारण आम्हाला समजू शकलो नाही. फुफ्फुसात ट्युमर असल्याचं ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. पण डॉक्टरांनी वेळीच निदान आणि शस्त्रक्रिया करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले आहेत"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या