नवी दिल्ली, 03 डिसेंबर : काही प्राणी (animal) असे असतात ज्यांच्यातील फरक ओळखणं म्हणजे कठीण असतं. एकाच प्रजातीतील हे प्राणी वेगवेगळे असतात मात्र दिसायला हुबेहुब असतात. त्यापैकीच आहेत ते म्हणजे बिबट्या (leopard) आणि जॅग्वार (jaguar). तुम्हाला प्राण्यांची आवड असेल आणि तुम्ही टीव्हीवर प्राण्यांसंबंधी कार्यक्रम पाहत असाल किंवा न्यूजपेपर, पुस्तकात प्राण्यांचे फोटो पाहत असाल तर कदाचित असा एक तरी किस्सा असेल जेव्हा तुमच्यासोबत एखादी व्यक्ती असेल आणि हा बिबट्या की जॅग्वार हे ओळखण्याची स्पर्धा लागली असेल. आता अशीच स्पर्धा सध्या सोशल मीडियावर लागली आहे. भारतातील वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या फॉलोअरसाठी एक कोडं टाकलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी दोन फोटो टाकले असून यामध्ये फोटो टाकला आहे. यामध्ये बिबट्या कोणता आणि जग्वार कोणता हे ओळखण्याचं चॅलेंज तुम्हाला दिलेलं आहे. 30 नोव्हेंबरला International Jaguar Day होता. त्यानिमित्तानं कासवान यांनी हा फोटो शेअर केला होता.
Lets see how many can identify. Which one of them is Jaguar & which one is Leopard. It’s #InternationalJaguarDay. pic.twitter.com/sDMaTJPRpF
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 30, 2020
कासवान यांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे. एका युझरनं तर चित्ता,जग्वार, बिबट्या आणि पँथर तुम्ही एकत्र बसून हा विषय एकदाचा मिटवून टाका, खूप कन्फ्युजन होत आहे रे बाबा ! अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Leopard, jaguar, panther and cheetha... let's sit together and settle this all at once... boht confusion hai re baba..
— gaurav saxena (@gsaxena37) December 1, 2020
दोन्हीही प्राणी दिसायला एकदम सारखे असल्यानं, त्यांची शरीररचना सारखी असल्यानं आणि दोघांच्याही अंगावर एकसारखे ठिपके असल्यानं त्यांच्यातील फरक ओळखणं जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे तुम्ही हे आव्हान स्वीकारत तुम्हाला यांच्यातील फरक ओळखणं जमतं का ते पाहा. शिवाय तुमच्या मित्रमैत्रिणींनादेखील हे चॅलेंज द्या. कासवान यांनी पुढे आपल्या कोड्याचं उत्तरंही पुढे दिलं आहे आणि हा फरक कसा ओळखावा हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. हे वाचा - दररोज दूध प्यायल्यानं खरंच उंची वाढते? दरम्यान कासवान यांच्या प्रश्नामुळे या दोघांबाबत बरीच माहिती नेटिझन्सना मिळाली. रिसर्चनुसार जॅग्वार मध्य आणि दक्षिण अमेरिकेत राहतात, जिथं ते मोठ्या मांजरांच्या प्रजातीतील सर्वात मोठे प्राणी आहेत. तर आफ्रिका आणि आशियातील काही भागात बिबट्या राहतात जिथं ते मोठ्या मांजरांच्या प्रजातीतील सर्वांत लहान प्राणी आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या (national geographic) मते जॅग्वार बिबट्यांपेक्षा मोठे आणि ताकदवान आहेत आणि त्यांचं वजन 113 किलोपर्यंत असू शकतं. त्या तुलनेत बिबट्याचं वजन हे केवळ 79 किलोपर्यंत असतं. हे वाचा - आता तुम्ही बदलू शकता होणाऱ्या बाळाचं रंग-रूप, डिझायनर बेबीसाठी येतो इतका खर्च जॅग्वारला पोहायला आवडतं. त्याचबरोबर तो महाकाय अनाकोंडाचीदेखील शिकार करतो. तर त्याच्या तुलनेत बिबट्या पाण्यापासून दूर राहून हरिण आणि इतर सस्तन जंगली प्राण्यांची शिकार करून आपली भूक भागवतो. आयडाहोमध्ये स्वतंत्र प्राणी संशोधक असलेल्या ब्यून स्मिथच्या(Boon smith) मते नॅशनल जिओग्राफिक रिपोर्टनुसार इतर हिंसक प्राण्यांच्या तुलनेत जॅग्वारच्या जबड्याचे स्नायू आणि दात मजबूत असतात. कोणत्याही मोठ्या प्राण्यासारखीच तीव्र चावा घेण्याची क्षमता आहे. पोर्टलँड प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉन मूर (Don moore) यांच्या मतानुसार, जॅग्वार आणि बिबट्या वेगवेगळ्या वातावरणात राहतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्याचा आधार घ्यावा लागतो.