मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Weight Loss Tips: रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, जाणून घ्या वेटलॉसचा फंडा

Weight Loss Tips: रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, जाणून घ्या वेटलॉसचा फंडा

Weight Loss Tips: रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, जाणून घ्या वेटलॉसचा फंडा (प्रातिनिधिक फोटो)

Weight Loss Tips: रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, जाणून घ्या वेटलॉसचा फंडा (प्रातिनिधिक फोटो)

वजन कमी करायचं असेल तर जसा योग्य आहार घेणं गरजेचं आहे तसंच तो योग्य वेळी घेणंही गरजेचं आहे. रात्रीच्या जेवणाची वेळ बदललीत तर वजन कमी करायला मदत होऊ शकते.

    नवी दिल्ली, 7 डिसेंबर : आपलं वजन कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. कुणाला तरुण दिसायचं असतं तर कुणाला रोगमुक्त व्हायचं असतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची डाएट पाळण्याचा प्रयत्न खूप जण करतात. त्यांना हे ही माहीत असतं की नुसतं आहार नियंत्रण (Diet) करून भागणार नाही तर त्याबरोबर व्यायामही करायला हवा. हे जसं महत्त्वाचं आहे तसंच नुसता आहार नियंत्रित करून उपयोग नसतो, तर तो आहार कोणत्या वेळी घ्यायचा यालाही महत्त्व असतं.

    तुम्हाला आरोग्यवान रहायचं असेल तर आहाराच्या वेळा पाळायला अनन्यसाधारण महत्त्व (Importance of food intake timings) आहे पण अनेकदा त्याकडेच दुर्लक्ष केलं जातं. तुमचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या तिन्ही आहारांचा तुमच्या तंदुरुस्तीवर परिणाम होत असतो. पण जर तुम्ही रात्री योग्य वेळी जेवण (Dinner Timing) केलंत तरीही तुमचं वजन कमी रहायला मदत होते. त्याबाबतच आज जाणून घेऊया.

    वाचा : डोळ्यांचं तेज वाढवतील 'हे' घरगुती आणि रामबाण 6 Juices

    ठेवा तीन तासांचं अंतर

    जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी तीन तास तुमचं जेवण झालेलं असावं. यालाही महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जेवणानंतर जितका वेळ तुमचं शरीर क्रियाशील असतं तितका वेळ ते कॅलरी जाळत राहतं म्हणजे त्यांचा वापर करत असतं. तुम्ही जेवण झाल्यानंतर तीन तासांच्या आतच जर झोपलात तर हव्या तितक्या कॅलरी वापरल्या जात नाहीत. या कॅलरी शरीरात फॅटच्या स्वरूपात साठवल्या जातात. त्याचबरोबर जेवल्यानंतर लगेचच झोपलं तर रक्तातील साखर आणि इन्शुलिनचं प्रमाणही वाढायला लागतं. त्यामुळे वजनासोबतच इतर व्याधीही होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर तीन तासांनी झोपावं.

    वाचा : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत

    सात वाजेपर्यंत जेवण घ्या उरकून

    मग रात्रीचं जेवण कधी करायचं हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. जर तुम्हाला तंदुरूस्त रहायचं असेल तर संध्याकाळी सात वाजता तुम्हाला रात्रीचं जेवण करायला हवं. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तुमची चयापचय क्रिया सुरळीत काम करेल आणि खाल्लेलं अन्न पचल्यामुळे तुमचं वजनही वाढणार नाही. तुम्ही जर उशिरा जेवलात तर ते अन्न तुमच्या आतड्यात पडून राहतं आणि त्याचा तुमच्या चयापचय क्रियेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे संध्याकाळी सात वाजताच जेवण उरकून घेऊन नंतर काम करणं हिताचं ठरतं.

    आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे झोपण्यापूर्वी शरीरात मेलाटोनिन हे हॉर्मोन स्रवतात. या हॉर्मोनचा संबंध आपल्या अन्न पचनाशी आहे. जेव्हा तुमचा मेंदू शरीराला झोपण्याची आज्ञा देतो तेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न फॅटमध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे वजन आणि जाडी वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण लवकर म्हणजे संध्याकाळी सात वाजता करणंच हिताचं आहे.

    First published:

    Tags: Health, Health Tips, Weight loss