मुंबई, 10 डिसेंबर : सध्या सर्वत्र वेडिंग सिझन (Wedding Season) सुरू आहे. कोरोना नियमांमध्ये सूट मिळाल्यानं अनेकांनी आपापले खोळंबलेले लग्नसोहळे पार पाडण्याचा धडाका सुरू केला आहे. आता लग्नामध्ये सर्वात जास्त महत्त्व प्रीवेडिंग (Pre Wedding) आणि वेडिंग फोटोशूटला दिलं जातं. काहीजण तर लग्नापेक्षा जास्त खर्च वेडिंग फोटोशूटवर करतात. आपलं वेडिंग फोटोशूट एकदम हटके असावं, असा प्रत्येक जोडप्याचा प्रयत्न असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वेडिंग फोटोशूटचा (Wedding Photoshoot) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात भीतीनं गोळाच आला आहे. व्हिडिओतील नवरा-नवरीचा (Bride and Groom) आता जीव जातो की काय? असा प्रश्न हे वेडिंग फोटोशूट पाहताना नेटीझन्सला पडला आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. bride_buzz नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपं लग्नाच्या ड्रेसमध्ये (Wedding Dresses) एका अनोख्या ठिकाणी पोहोचलेलं दिसत आहे. छान हेअरस्टाईल आणि पांढर्या वेडिंग ड्रेसमध्ये वधू खूप सुंदर दिसत आहे तर पांढऱ्या सूटमध्ये तिचा जोडीदारही हॅन्डसम दिसत आहे. वधू-वरांसोबतच त्यांचा कॅमेरापर्सनही मस्त फोटो काढण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
फोटोशूटसाठी दोघंही पोज देण्यासाठी तयार होतात, तेवढ्यात त्यांच्या मागून एक विमान (Aircarft) येतं. हे विमान त्यांच्या डोक्यावरून अगदी काही अंतरावरून जातं. शिवाय त्या विमानातून धुरासारखं काहीतरी निघत असल्याचं दिसत आहे. विमान निघून गेल्यानंतर जोडप्याचा काय अवतार झाला आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच. विमान निघून गेल्यानंतर दोघेही हसताना दिसत असले तरी त्यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढलेले आहेत. हृदयाचा थरकाप (Scary Photoshoot) उडवणारं हे लग्नाचं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ कुठे काढण्यात आला आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, आता आतापर्यंत 82 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
आपलं लग्न अविस्मरणीय होण्यासाठी हटके गोष्टी करण्याच्या नादात या जोडप्यानं आपला जीव धोक्यात घातला. ठरल्याप्रमाणं विमान डोक्यावरून सुरक्षित अंतरावरून गेलं म्हणून ठिक झालं. मात्र, जर तसं झालं नसत तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा व्हिडिओ पाहून कुणीही त्यातील जोडप्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photoshoot, Viral photoshoot, Wedding couple