वॉशिंग्टन, 07 जून : माझी आई माझी मैत्रीण (Mother and daughter) आहे. मी तिच्याशी सर्वकाही शेअर करते, तिच्यापासून काहीच लपवत नाही. असे बहुतेक मुली म्हणतात. साहजिकच मुलीसाठी तिची सर्वात पहिली मैत्रीण कोण असेल तर ती तिची आई. आई आणि मुलीचं नातं हे मैत्रीचं नातं असतं. पण सध्या अशा मायलेकीची (Mother and daughter relation) चर्चा सुरू आहे, ज्यांच्या नात्याला दुसरं तोडच नाही. किंबहुना कदाचित या मायलेकीसारखी दुसरी मायलेक या जगात असूच शकत नाही (Mother and daughter shared sex tape with each other).
आई आणि मुलगी आपल्या खासगी आयुष्याबाबत फार फार तर काय शेअर करू शकतात. आपलं पहिलं प्रेम, आपला बॉयफ्रेंड, आपली लव्ह स्टोरी... पण सेक्स. कधी कोणत्या आई आणि मुलीने सेक्सवर चर्चा करताना तरी ऐकलं आहे का? पण अमेरिकेतील मायलेकीने यावर फक्त चर्चाच केली नाही तर चक्क आपल्या पहिल्या सेक्सचा व्हिडीओही शेअर केला आहे. तुम्हाला वाचूनच धक्का बसला ना?
सध्या अमेरिकेतील एका मायलेकीची जोडी चर्चेत आहे. त्यांनी आई आणि मुलीचं नातं एका सामान्य नात्यापेक्षा अगदी नव्या टप्प्यावर नेलं आहे. रायकिया लुई आणि कार्ला मेकॉय एकत्र स्वयंपाक करतात, एकत्र शॉपिंग करतातच पण यासोबत खासगी आयुष्यातील बाबीही त्या एकमेकींशी शेअर करतात.
हे वाचा - साडीतल्या या सुंदर नारीला नाजूक समजू नका; तिचा VIDEO पाहून सर्वांना फुटला घाम
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार 26 वर्षांची लेक लुई आणि 44 वर्षांची आई कार्ला एकमेकींसोबत सर्वकाही शेअर करतात. अगदी या मायलेकी आपली सेक्स लाइफसुद्धा एकमेकींसोबत शेअर करतात. कार्लाने आपल्या मुलीला आपली पहिली सेक्स टेप दोन वर्षांपूर्वी दाखवली होती. त्यानंतर वर्षभऱाने लुईसनेसुद्धा आपली पहिली सेक्स टेप आपल्या आईला दाखवली. त्यानंतर दोघांनी याबाबत आपले विचारही एकमेकींसोबत शेअर केले.
लुईस सांगते की, आईसोबतच्या अशा ंसंंबंधांमुळे तिने आपल्या आयुष्यात काही लोकांना गमावलं आहे. पण मला त्यामुळे काही फरक पडत नाही. कारण माझ्या आईपेक्षा मला आयुष्यात दुसरं काहीच महत्त्वाचं नाही.
हे वाचा - पुरुषांसाठी माठातलं पाणी पिणंच का आहे फायदेशीर?
अमेरिकेच्या एलाबामामध्ये राहणाऱ्या या मायलेकींनी अमेरिकेच्या एका टीव्ही शोवरसुद्धा हजेरी लावली होती. तेव्हापासून त्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांच्या या अशा नात्याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Daughter, Mother, Relationship, Sex