CoronaVirus: कोरोना महामारी कधी संपणार? शास्त्रज्ञांनी सांगितलं विचारात पाडणारं भयंकर सत्य

CoronaVirus: कोरोना महामारी कधी संपणार? शास्त्रज्ञांनी सांगितलं विचारात पाडणारं भयंकर सत्य

जगभरातील शास्रज्ञ (Scientist on Corona Virus)त्यांचा अंदाज योग्य मानून संशोधन करत होते. पण गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलेल्या लशीच्या चाचण्यांतून आलेले निष्कर्ष शास्त्रज्ञांना आपल्या अंदाजाचा फेरविचार करायला लावणारे आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 05 मार्च : गेल्या वर्षी 2020 च्या मार्च महिन्यात सुरू झालेली कोरोना महामारी अजूनही संपण्याचं नाव घेत नाही. जगभरात त्यावर लशी विकसित झाल्या आणि त्या रुग्णांना दिल्याही गेल्या पण संपूर्ण जगाला वेठीस धरणारं हे संकट अद्याप टळण्याचं नाव घेत नाही. कोविड-19 विषाणूमध्ये म्युटेशन (COVID-19 Mutations) होऊन नवनवे स्ट्रेन तयार होत आहेत त्यामुळे जगभरातील शास्रज्ञांना 24 तास सर्तक राहावं लागतं आहे. अशावेळी जगातील प्रत्येकाला हाच प्रश्न पडला असणार की हे सगळं, ही महामारी कधी संपणार?

वॉशिंग्टन विद्यापीठातील रोगतज्ज्ञ ख्रिस मरे यांनी कोविड-19 मुळे जगात होणारा संसर्ग, मृत्यू याबद्दल आपला अंदाज आतापर्यंत व्यक्त केला होता आणि जगभरातील शास्रज्ञ त्यांचा अंदाज योग्य मानून संशोधन करत होते. वेगवेगळ्या लशींच्या माध्यमातून समजात हार्ड इम्युनिटी (Herd Immunity) तयार होईल त्यातून किंवा लसीकरणातून अनेक देशांत या महामारीचं संक्रमण पूर्ण थांबेल अशी आशा मरे यांना आतापर्यंत होती. पण गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलेल्या लशीच्या चाचण्यांतून आलेले निष्कर्ष मरे यांना आपल्या अंदाजाचा फेरविचार करायला लावणारे आहेत. या चाचण्यांमुळं असं लक्षात आलं की कोविड-19 चे व्हेरियंट (Covid-19 Variant) प्रचंड वेगानी निर्माण होत असून लसींना निष्प्रभ करत आहेत. एवढंच नाही तर हे व्हेरियंट या आधी लागण झालेल्या रुग्णांमधील नैसर्गिक इम्युनिटीही कमी करत आहेत.

सिएटलमधील इन्स्टिट्युट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे संचालक मरे यांनी रॉयटर्सशी संवाद साधला ते म्हणाले, ‘हा अहवाल पाहिल्यानंतर माझी झोपच उडाली. मी मलाच प्रश्न केला, हे (कोरोना महामारी) कधी संपायचं?’ कोविडचे नवे व्हेरियंट माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती समाप्त करत आहेत त्यांना रोखण्यासाठी मरे संशोधन करत असून येत्या आठवड्यात ते हे संशोधन सर्वांसमोर मांडतील.

कोरोना विषाणूचा संसर्ग संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किंवा या महामारीचा जवळून अभ्यास करणाऱ्या 18 विशेषज्ज्ञांच्या रॉयटर्सनी मुलाखती घेतल्या. यापैकी काहींचं मत असं आहे, की गेल्यावर्षी कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी दोन लशी तयार झाल्या त्यांची परिणामकारकता 95 टक्के होती. तेव्हा एक मोठं यश मिळालं असं शास्रज्ञांना वाटलं होतं. गोवराची लस सापडली होती तेव्हा जसं वाटलं होतं तसंच कोरोना लशींमुळे याचा संसर्ग थांबवणं आता मोठ्या प्रमाणात शक्य होईल असंही शास्रज्ञांना वाटलं होतं. पण आता गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये (South Africa & Brazil) सापडलेल्या कोविडच्या नव्या व्हेरियंटमुळे या आशा धुळीला मिळाल्या आहेत. त्यांना असं वाटतंय की SARS-CoV-2 एक एंडेमिक व्हायसर म्हणून मानवजातीसोबत राहील एवढंच नाही तर तो विविध काळ फिरत राहील आणि त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत मानवजातीच्या पाठीवर रोगांच्या साथी आणि मृत्युंचं मोठं संकट राहाणार आहे. त्यामुळे मास्क वापरणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं विशेषकरून ज्यांना प्रादूर्भाव व्हायचा सर्वाधिक धोका आहे त्या व्यक्तींनी ही काळजी घेणं अत्यावश्यक आहे असंही या शास्रज्ञांचं मत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी एका मुलाखतीत म्हणाले, ‘ मी लसीकरण करून घेतल्यानंतरही मास्क घालतो, कारण आसपास एखादा कोविड व्हेरियंट असेल तर? विषाणूचा एक सूक्ष्म व्हेरियंट सापडतो आणि ही महामारी आता संपेल असा तुम्ही बांधलेला अंदाज उद्धवस्त करून टाकतो. ’ ‘जरी विषाणूंचे नवे व्हेरियंट संसर्ग वाढवत असले तरीही अतिशय विक्रमी काळात विकसित झालेल्या लशींमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवर आणि मृत्युंच्या संख्येवर बरंच नियंत्रण मिळवता आलं आहे. माणसाच्या रोगप्रतिकारशक्ती यंत्रणेच्या विषाणूशी लढण्याच्या क्षमतेविषयी अजून बरंच काही शिकायचं बाकी आहे,’ असं मरे यांच्यासह इतर शास्रज्ञांचं मत आहे. 2021 च्या सुरुवातीपासून कोविड संसर्गाचा दर खूप कमी झाला आहे. पहिल्यांदा लसीकरण केलेल्या लोकांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं (Hospitalization) आणि आजार गंभीर होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे.

अमेरिकेत फ्लूपेक्षाही भयानक स्थिती उद्भवेल

दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंट किंवा इतर म्युटेशनचे विषाणू गतीने पसरत राहिले तर अमेरिकेत या हिवाळ्यातील कोविड-19 मुळे हॉस्पिटलात दाखल केलेली आणि मृत्युची प्रकरणं वाढून सामान्य तापाच्या (फ्लू) प्रकरणांच्या चौपट होतील असा मरे यांचा अंदाज आहे. अमेरिकेतील निम्म्या लोकसंख्येला 65 टक्के परिणामकारकता असलेली लस दिली असल्याचा अंदाज आहे. फ्लुमुळे मृत्यु (Flu) होण्याची अमेरिकेतील सरकारी आकडेवारी गृहित धरली तर जर हिवाळ्यात कोरोनानी भयंकर रूप धारण केलं तर 2 लाख जणांचा मृत्यु होऊ शकतो असा अंदाज शास्रज्ञांनी वर्तवला आहे. मरे यांच्या इन्स्टिट्युटने 1 जून 2021 पर्यंतच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार तोपर्यंत अमेरिकेत अजून 62 हजार तर जगात 6 लाख 90 हजार जणांचा कोविडमुळे बळी जाऊ शकतो. या मॉडेलमध्ये लसीकरण आणि दक्षिण आफ्रिका व ब्राझीलमधील व्हेरियंटमुळे होणाऱ्या संक्रमाणाचा विचार करण्यात आला आहे.

विविध देशांचे निरनिराळे अंदाज

ही महामारी कधी संपणार यांच विविध देशांतील सरकारांनी दिलेलं उत्तर पाहून अनेक शास्रज्ञांना फेरविचार करावा लागतो आहे. जगातील सर्वांत वेगवान लसीकरण केल्यानंतरही सर्वाधिक कडक लॉकडाउनमधून हळूहळू देश बाहेर पडेल असं ब्रिटिश सरकारनी (British Government) गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. अमेरिकी सरकारने महामारी संपण्याबद्दल म्हटलं होतं की ती उन्हाळा संपेपर्यंत किंवा 2021 ख्रिसमसपर्यंत महामारी संपेल पण नंतर तो अंदाज बदलून मार्च 2022 पर्यंत संपे असा करण्यात आला. इस्रायलने (Isreal) तर कोविड-19 मधून बरे झालेले आणि लस घेतलेले अशा नागरिकांना ग्रीन पास देऊ केला आहे त्याआधारे ते हॉटेल आणि थिएटरमध्ये जाऊ शकतात. पण प्रतिकारशक्ती किती काळ टिकणार हे माहीत नसल्याने या ग्रीन पासची मुदत 6 महिने ठेवली आहे. जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील एपिडेमॉलॉजिस्ट स्टिफन बारल म्हणाले, ‘ म्हणजे या महामारीतील आणिबाणीचा काळ निघून गेला आहे असं आपण म्हणू शकतो का ? अजूनही हॉस्पिटल आणि आयसीयू रुग्णांनी भरलेले नाहीत का?लोकांचा भयानक मृत्यु होत नाहीए का?’ एकूणात काय या शास्रज्ञांनाही कोविडच्या साथीचा शेवट कधी होईल याचा अंदाज येत नाहीए.

शास्रज्ञांचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) इमर्जन्सीज प्रोग्रॅमचे प्रमुख डॉ. मिशेल रायन यांच्यासह जगभरातील शास्रज्ञांनी नोव्हेल कोरोना विषाणूच्या महामारीच्या सुरुवातीला इशारा दिला होता की ही साथ पॅनडेमिक नाही तर एनडेमिक म्हणजे जगाच्या विनाशाकडे नेणारी ठरू शकते किंवा ती कधीच संपणार नाही.

शास्रज्ञांना कोविड विषाणूबद्दल अजून बराच अभ्यास करायचा आहे. त्यामुळे गोवर किंवा फ्लूसाठी सर्व समाजघटकांत मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यानंतरही हे आजार दरवर्षी जगभरात लक्षावधी लोकांचे प्राण अजूनही घेत आहेत तसंच कोरोनाचं होणार का ? असा प्रश्न आता शास्रज्ञांनाही पडला आहे. 2020 मध्ये बहुतांश शास्रज्ञांना वाटत होतं की या विषाणूत फारसे बदल होणार नाहीत. नोव्हेंबर 2020 मध्ये फायझर आयएनसी (Pfizer Inc)आणि त्यांचा जर्मन पार्टनर बायोएनटेक एसई (BioNTech SE), मॉडेर्ना आयएनसी (Moderna Inc) यांनी दावा केला होता की त्यांच्या लशींच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये त्या 95 टक्के परिणामकारक ठरल्या आहेत आणि हा दर फ्युच्या लशीपेक्षा खूपच अधिक होता.

रॉयटर्सला मुलाखत देणाऱ्या शास्रज्ञांपैकी अनेकांना वाटलं होतं की लशींमुळे हा आजार जाणार नाही पण काहींना नव्या डाटाच्या आधारे कोविड-19 चं उच्चाटन करता येईल अशी आशा वाटते. लंडनमधील इंपिरियल कॉलेजमधील इन्फेक्शियस डिसिज एपिडेमॉलॉजी अध्यासनाशी संबंधित अझरा घनी यांचं मत आहे की पहिल्यांदा लस घेतल्याने ख्रिसमसपर्यंत कोविडचं उच्चाटन होईल. पहिल्या प्रयत्नातच प्रचंड परिणामकारक लशी तयार होतील अशी आम्ही अपेक्षाच करत नाही.

ही आशा फार काळ टिकली नाही आणि डिसेंबर 2020 मध्ये नव्या व्हेरियंटने ब्रिटनमध्ये संसर्ग वाढवला आणि साधारणपणे तेव्हाच शास्रज्ञांना दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमधल्या वेगाने पसरणाऱ्या व्हेरियंटचा शोध लागला. फायझरमधील ज्येष्ठ शास्रज्ञ फिल डॉर्मिटझर म्हणाले होते की, या लशीचा शोध म्हणजे मानवजातीसाठी मौल्यवान शोध आहे पण जानेवारी 2021 मध्ये व्हेरियंट सापडल्यावर आपलं विधान बदलावं लागणार असल्याचं मान्य केलं. जानेवारीच्या शेवटी लक्षात आलं की यूकेत झालेल्या नोव्हाव्हॅक्स लशीच्या चाचण्यांत ती 89 टक्के प्राभावी असल्याचं लक्षात आलं होतं पण दक्षिण आफ्रिकेत ती 50 टक्केच परिणामकारक ठरली. जानेवारीतच हे सिद्ध झालं की अस्ट्राझेनेका पीएलसी व्हॅक्सिनही दक्षिण आफ्रिकेतील कोविड व्हेरियंटवर मर्यादित परिणाम करू शकली.

सॅन डिएगोमधील ला जोल्ला इन्स्टिट्युट फॉर इम्युनॉलॉजीमधील व्हायरॉलॉजिस्ट शेन क्रॉटी म्हणाले, ‘ मी याला सायंटिफिक व्हिप्लॅश (scientific whiplash) म्हणेन डिसेंबर 2020 मध्ये मला वाटलं होतं की कोरोना महामारीचं फंक्शनल उच्चाटन आता शक्य आहे जसं गोवराचा केलं होतं. त्यामुळे डिसेंबर 1ला जी स्थिती होती तिच 1 जानेवारीला आहे ती म्हणजे जितक्या जास्त जणांचं लसीकरण करता येईत तितकं अधिक लसीकरण करणं हाच या घडीचा कोरोनावरील विज्ञानसंमत उपाय आहे. पण तरीही अपेक्षित परिणाम समान नसेल.

First published: March 5, 2021, 2:22 PM IST

ताज्या बातम्या