Home /News /coronavirus-latest-news /

'बाहेर, मोकळ्या हवेत Coronavirus चा धोका कमी; पण... ' नवा अभ्यास काय सांगतो वाचा

'बाहेर, मोकळ्या हवेत Coronavirus चा धोका कमी; पण... ' नवा अभ्यास काय सांगतो वाचा

घरी राहा, सुरक्षित राहा असं इतके दिवस Covid-19 बाबतीत सांगितलं जात होतं. पण आता बाहेरच्या स्वच्छ मोकळ्या हवेतही Coronavirus चा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे, असं एक नवा अभ्यास सांगतो. पण एक महत्त्वाची गोष्टही या अभ्यासातून समोर आली आहे.

पुढे वाचा ...
    व्हर्जिनिया, 13 ऑक्टोबर :  जगभरात सध्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत लाखो रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असं इतके दिवस Covid-19 बाबतीत सांगितलं जात होतं. पण आता बाहेरच्या स्वच्छ मोकळ्या हवेतही Coronavirus चा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे, असं एक नवा अभ्यास सांगतो. पण एक महत्त्वाची गोष्टही या अभ्यासातून समोर आली आहे. मोकळ्या हवेत फिरतानाही मास्कमुळे (mask) तुम्हाला कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विशेषतः बंद जागेत गर्दी जमली तर याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. या ठिकाणी नागरिकांचा एकमेकांशी जास्त प्रमाणात संपर्क होत असल्यानं संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. कोरोनाचा प्रसार हा एका रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीला होत आहे. त्यामुळं मोकळ्या हवेत याचा प्रसार होत नसल्याचं समोर आलं आहे. बाहेरच्या जगात किती धोका? कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून विषाणूचा प्रवास पाहिला (tracing the virus) तर हॉटेल्स, रेस्टॉरंट, कारखाने, ऑफिसेस, सार्वजनिक सभा आणि रेल्वे  किंवा विमान प्रवासामधून अधिकाधिक लोकाना कोरोनाची लागण झाली आहे, असं लक्षात येईल.  एप्रिलमधील एका संशोधनात चीनमधील दोन गावांमध्ये 7 हजारांहून अधिक निरीक्षणं नोंदवण्यात आली. यामध्ये केवळ एकच केस बाहेरील वातावरणामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची आढळून आली. 25,000 प्रकरणांमध्ये 6 टक्के केस या बाहेरील वातावरणामुळं झालेल्या संसर्गाच्या आढळून आल्या आहेत. ख्राईस्टचर्च विद्यापीठातील प्रोफेसर आणि या संशोधनाचे संशोधक माईक विड यांनी याविषयी सांगितलं की, मोकळ्या वातावरणातल्या दैनंदिन कामांदरम्यान कोरोनाच्या केसेस सापडत असल्याचा आम्ही दावा करत नाही. त्यामुळे बाहेरील वातावरण हे घरातील वातावरणापेक्षा सुरक्षित असल्याचं अनेक देशांतील संशोधकांनी देखील म्हटलं आहे. घरापेक्षा बाहेर सुरक्षित? घरातल्या बंदिस्त वातावरणापेक्षा बाहेरील वातावरण हे घरातील वातावरणापेक्षा सुरक्षित असण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपण घेतलेला श्वास आणि त्याबरोबर हवेत पसरलेले विषाणू तत्काळ पसरले जातात. त्यामुळे एकाच जागी कुठल्या पृष्ठभागावर साठून राहात नसल्यानं त्याचा धोका कमी प्रमाणात असतो. घरामध्ये किंवा बंदिस्त वातावरणात तो एका जागी किंवा वस्तूवर विषाणू जिवंत राहू शकतो. त्याचबरोबर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात तुम्ही आला  आणि काही सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही बाजूला झाला तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका नाही. काही मिनिटे तुम्ही त्याच्या संपर्कात आला तर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका तुम्हाला वाढू शकतो. भारतीय वातावरण वेगळं विशेषतः पाश्चिमात्य जगात जिथे नैसर्गित हवा खेळती नसते तिथे हा धोका अधिक आहे. थंडीमुळे किंवा विषम वातावरणामुळे नागरिक बंदिस्त हवेत एसी किंवा कंट्रोल्ड टेम्परेचरमध्ये राहतात. या वातावरणात कोरोना विषाणू अधिक काळ कार्यरत राहू शकतो. म्हणूनच घरात कोरोना रुग्ण असल्यास तो राहात असलेली खोली हवेशीर असावी, खिडक्या असाव्यात असं आपल्याकडे सांगितलं जातं. मास्क का आवश्यक? Virginia Tech मधील airborne virus transmission संबंधातील तज्ज्ञ लिनसी मर यांनी बाहेरच्या गर्दीमध्ये मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीमध्ये आपण कोणत्याही व्यक्तीच्या जवळून जाण्यासाठी अवघे काही सेकंद लागतात. त्यामुळं संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. पण मास्क वापरायलाच हवा असंही तिने सांगितले. लोकल, कॅब, बस आदी ठिकाणी मात्र गर्दीत एकाच ठिकाणी उभं राहून किंवा बसून प्रवास होतो. त्यामुळे अर्थातच त्या वेळी संसर्गाचा धोका अधिक असतो.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या