मुंबई, 14 ऑक्टोबर : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 72 लाखांवर गेली आहे. गेल्या 24 तासांत 63 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 730 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना येथून आतापर्यंत 1 लाख 10 हजार 586 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 63,01,928 वर पोहोचली आहे. सध्या भारतात रिकव्हरी रेट 87% असून कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
India reports a spike of 63,509 new #COVID19 cases & 730 deaths in the last 24 hours.
Total case tally stands at 72,39,390 including 8,26,876 active cases, 63,01,928 cured/discharged/migrated cases & 1,10,586 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/c4pG9su1LQ
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. मंगळवारीही हीच घट कायम होती. दिवसभरात 15 हजार 353 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आजपर्यंत एकूण 12,97, 252 बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.3 टक्के एवढे झाले आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी 8522 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आलं. तर 187 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 77,62, 005 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15,43, 837 (19.89 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23,37,899 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,857 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.