मुंबई, 09 ऑगस्ट : बहुचर्चित बिग बॉसच्या पंधराव्या (Bigg boss 15) सिझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धकांचा समावेश आहे. त्यांची नावं आणि माहिती आपल्याला झालीच आहे. बिग बॉस 15 (Bigg boss 15 OTT) मधील स्पर्धकांपैकी एक असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) जिच्याकडे असं टॅलेंट आहे, जे या स्पर्धकांपैकी कुणाकडेच नसावं. उर्फीचं टॅलेंट तुम्हाला समजलं तर तुम्ही हैराण व्हाल. उर्फी ही जुन्या कपड्यांपासून सेक्सी आऊटफिट बनवते. बिग बॉसमध्ये असलेली उर्फी जावेद ही अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच. पण तिच्या हातातही जागू आहे. ती कात्री चालवण्यात तरबेज आहे. म्हणजे ती जुन्या कपड्यांपासून सेक्सी ग्लॅमरस असे आऊटफिट बनवते.
उर्फी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्रामवर गेल्यात तर तुम्हाला तिचे फोटो आणि तिच्या अॅक्टिंग व्हिडीओसोबत आणखी काही व्हिडीओ दिसतील. ज्यामध्ये तिची ही आवड, कौशल्य दिसून येईल. जुन्या कपड्यांना ती वेगळं रूप देऊन त्यांना नवं बनवते. जुन्या कपड्यांपासून ते सॉलिड ड्रेस बनवते. हे वाचा - ‘हो मी वेगळा आहे’; Bigg boss फेम अभिनव शुक्लाने उलगडलं आपलं मोठं गुपित उर्फी ‘सोनी टीव्ही’वरील ‘बड़े भैया की दुल्हनिया’मध्ये दिसून आली. यात ती अवनी पंतची भूमिका साकारत होती. त्यानंतर ती ‘स्टार प्लस’वरील ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ या सीरिअलमध्ये दिसली. ‘सब टीव्ही’वरील ‘सात फेरों की हेरा फेरी’मध्ये कामिनी जोशी, ‘कलर्स’वर ‘बेपनाह’मध्ये बेला कपूर आणि ‘स्टार भारत’वरील ‘जीजी मां’मध्ये पियाली आणि ‘अँड टीव्ही’वर ‘डायन’मध्ये तिने नंदिनी म्हणून दिसली. त्यानंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता’मध्ये शिवानी भाटिया आणि ‘कसौटी जिंदगी’मध्ये तिने तनीशा चक्रवर्तीची भूमिका साकारली. हे वाचा - वादग्रस्त व्हिडीओ आला अंगाशी; Bigg Boss अभिनेत्रीला पोलिसांनी केली अटक उर्फी सीरिअलनंतर आता रिअॅलिटी शोमध्ये आपलं नशीब आजमावते आहे. बिग बॉसमध्ये ती सहभागी झाली आहे. यामुळे तिच्या करिअरला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे.