मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Amazon आणि Flipkart दोन्हीवर ऑफर्स; कुठल्या स्मार्टफोनवर मिळणार दणदणीत सवलती पाहा यादी

Amazon आणि Flipkart दोन्हीवर ऑफर्स; कुठल्या स्मार्टफोनवर मिळणार दणदणीत सवलती पाहा यादी

कुठल्या स्मार्टफोन्सवर ऑनलाइन साइट्स भरभक्कम डिस्काउंट आणि ऑफर देत आहेत. पाहा Amazon आणि Flipkart चे सेल सुरू होत आहेत. त्याआधीच पाहून ठेवा या smart Phone ची यादी..

कुठल्या स्मार्टफोन्सवर ऑनलाइन साइट्स भरभक्कम डिस्काउंट आणि ऑफर देत आहेत. पाहा Amazon आणि Flipkart चे सेल सुरू होत आहेत. त्याआधीच पाहून ठेवा या smart Phone ची यादी..

कुठल्या स्मार्टफोन्सवर ऑनलाइन साइट्स भरभक्कम डिस्काउंट आणि ऑफर देत आहेत. पाहा Amazon आणि Flipkart चे सेल सुरू होत आहेत. त्याआधीच पाहून ठेवा या smart Phone ची यादी..

    मुंबई, 15 ऑक्टोबर : शनिवारपासून नवरात्र सुरू होत आहे. त्याबरोबर ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर सेलचा धमाका सुरू होत आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon great Indian Festival) आणि बिग बिलियन डेजच्या (Flipkart Big Billion Days) सेलला सुरुवात होण्यापूर्वीच दोन्ही ऑनलाइन पोर्टलनी त्यांच्याकडे कुठल्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळेल याची यादी जाहीर केली आहे. अनेक स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर मिळणार आहेत. अमॅझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 17 ऑक्टोबरपासून पाच दिवस असणार आहे. तर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2020 सेल हा 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. नेहेमीप्रमाणे ॲमॅझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लसच्या ग्राहकांसाठी हा सेल 24 तास आधी उपलब्ध होणार आहे. तर त्यानंतर इतर ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. किंमत आणि सवलती याबाबतची माहिती ही आधीच जाहीर केली जाणार आहे. जेणेकरून सवलती बाबतीत योग्य तो निर्णय ग्राहक आधीच घेऊ शकतील‌. तसंच या सणासुदीच्या काळाच्या आधी आपण कुठला स्मार्टफोन घ्यायचा याबाबत गोंधळात आहात तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सॅमसंग, ॲपल, शाओमी यासारख्या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या सवलतींची यादी. OnePlus 8  ॲमॅझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये वन प्लस 8 च्या मॉडेलवर 5,000 रुपयांहून अधिक सूट देण्यात येणार आहे. 6 GB + 128 GB मॉडेलच्या किमती या 41,999 पासून 39,999 पर्यंत असणार आहेत. 12GB + 256 GB चे मॉडेल 44,999 पर्यंत मिळणार आहेत. तसेच ग्राहक 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI वर सुद्धा फोन घेऊ शकतात. या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10+ जे ग्राहक प्रीमियम स्मार्टफोन घेण्यास इच्छुक आहेत ते ॲमॅझॉन सेलच्या दिवशी सॅमसंग गॅलेक्सी S10 फोन घेऊ शकतात. ग्राहकांना यावर 34,000 रूपयांची सूट मिळू शकते. आणि ते 44,999 रूपयांपर्यंत हा फोन 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI वर हा फोन घेऊ शकतात. सॅमसंग गॅलेक्सी S10 या फोन सोबत तुम्हाला ड्युअल फ्रंट कॅमेरा सॅमसंग एक्सिनोस 9820 डिस्प्ले तसंच 6.40 इंचांचा एमोलोड डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा आणि 4,100mAh ची बॅटरी तुम्हाला मिळणार आहे. iPhone 11  ॲमॅझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हलमध्ये 68,000 रूपये किमतीचा आयफोन ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत मिळणार आहे. आयफोन 11 मध्ये 128 GB ऑनबोर्ड स्टोरेजसह A13 बायोनिक SoC आहे. तसेच यात ड्युअल कॅमेरा 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. Redmi 9 prime (4Gb + 64 GB)  तर आता आपण तुम्हाला परवडतील अशा फोनवर येऊयात. ॲमॅझॉनवर शाओमीचा नवीन रेडमी 9 प्राईम हा तुम्हाला 11,999 ऐवजी 9,999 रूपयांना मिळणार आहे. या ऑफर सध्या लाईव्ह आहेत आणि ग्राहक क्रेडिट कार्ड खरेदीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या फोनला 6.53 इंचाचा फुल एचडी (1,080×2,340pixel) डिस्प्ले आणि रीअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरा अणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. LG G8X फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 19,990 रुपयांना मिळणार आहे. या फोनची 6GB + 128GB मॉडेल्सची सध्याची किंमत 54,990 रूपये आहे. या फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी (1,080×2,340pixel) डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 SoC आहे. तसेच या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आणि 4,000 mAh ची बॅटरी आहे. MI 10 (8GB + 256 GB)  फ्लिपकार्ट हे नवीन शाओमी एमआयचा फोन 59,999 ऐवजी 49,999 रूपयांत देणार आहेत. या फोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC आहे. ही ऑफर फक्त फ्लिपकार्टवर 5% मर्यादित क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. MI 10 स्पोर्टसला 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. Motorola EDGE +  मोटोरोलाचा हा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन फ्लिपकार्टच्या सेल मध्ये 64,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच यात 6,7 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, 25 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि क्वालकाम स्नॅपड्रॅगन 856 SoC आणि 5,000 mAh बॅटरी आहे‌. ॲक्सिस बॅंकेचे क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना यावर खास सवलत मिळणार आहे. Realme X3 (Up to 8GB Ram)  रिअलमीचा हा फोन कमीत कमी 21,999 रुपयांनी फ्लिपकार्टच्या सेलमध्ये विकला जाणार आहे. तसंच 6GB चं मॉडेल हा 24,999 ला तर 8 GB चं मॉडेल हा 25,999 ला विकलं जाणार आहे. रिअलमी X3 या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आणि क्वाड कॅमेरा आहे तसंच या फोनमध्ये 6.57 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+SoC आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Amazon

    पुढील बातम्या