Home /News /lifestyle /

कोरोनाविरोधातील लढ्यात चिम्झीपानजीची मोठी भूमिका; त्याची विष्ठा करतेय तुमचा बचाव

कोरोनाविरोधातील लढ्यात चिम्झीपानजीची मोठी भूमिका; त्याची विष्ठा करतेय तुमचा बचाव

कोरोना लढ्याच चिम्पाझीचा (Chimpanzee) वापर कसा करून घेण्यात आला वाचा सविस्तर.

नवी दिल्ली, 07 एप्रिल: कोरोनाचा कहर झालेला असल्यामुळे सध्या लसीकरण मोहिमेवर भर देण्यात आला आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) अशा दोन लशींना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी (Astrazeneca) यांनी तयार केलेली असून, त्याची भारतीय आवृत्ती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (Serum Institute of India) तयार करण्यात आली आहे. या लशीसाठी कशाचा वापर करण्यात आला आहे, हे कळल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. या लशीसाठी चिम्झीपानजीच्या विष्ठेचा वापर (Chimpanzee Poop) करण्यात आला आहे. ही लस सुरुवातीला AZD1222 या नावाने ओळखली जात होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि त्यातूनच तयार झालेली व्हॅक्सिटेक ही कंपनी यांनी संयुक्त संशोधनातून AZD1222 ही लस विकसित केली आहे. चिम्पाझीच्या विष्ठेतून अॅडेनोव्हायरस (Adenovirus) वेगळा करून त्यामध्ये जनुकीय सुधारणा करून त्यापासून कोरोनाप्रतिबंधक लस विकसित करण्यात आली आहे, असं वृत्त 'आयएएनएस'च्या हवाल्याने 'तेलंगणटुडे'ने दिलं आहे. हे वाचा - ...म्हणून सर्वांना कोरोना लस देत नाही; उद्धव यांच्या मागणीनंतर केंद्राचं उत्तर कॉमन कोल्ड व्हायरस अर्थात साध्या सर्दीला कारणीभूत असलेला विषाणू म्हणजे अॅडेनोव्हायरस. त्या विषाणूमुळे चिम्पाझींमध्येही संसर्ग होतो. त्या विषाणूची प्रभाव कमी केलेली आवृत्ती वापरून लस विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी तो विषाणू चिम्पाझींच्या विष्ठेतून वेगळा करण्यात आला. SARS-CoV-2 या कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमधलं (Spike Protein) जनुकीय द्रव्यही त्यात वापरलेलं असतं. मुख्य म्हणजे त्यापासून नवनिर्मिती होणार नाही, असे बदल त्यात केलेले असतात. ही लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात सरफेस स्पाइक प्रोटीन तयार होतं. त्यामुळे नंतर शरीरात SARS-CoV-2 या विषाणूचा प्रादुर्भाव झाला, तर शरीराच्या प्रतिकार यंत्रणेद्वारे त्याला प्रतिकार केला जातो. हे वाचा - पुन्हा लॉकडाऊन! या काळात कसा दूर कराल तणाव, या गोष्टी नक्की करतील मदत.... सहा खंडांमधल्या 70 हून अधिक देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी या लशीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड (Covishield) या नावाने या लशीची निर्मिती करत असून, निर्माण होणाऱ्या डोसची संख्या लक्षात घेता सीरम इन्स्टिट्यूट ही जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
First published:

Tags: Chimpanzee, Corona, Corona vaccine, Health, Wellness, World health day

पुढील बातम्या