वॉशिंग्टन, 11 मार्च : आपल्याकडे एक तरी गाडी असावी असं भारतात अनेकांचं स्वप्न असतं. साधारणत: आपण प्रत्येकाच्या घरासमोर कार (Car), बाईक (Bike) उभी राहिलेली पाहिलं आहे. पण एखाद्या गावात प्रत्येक घराच्या दारात विमान (Plane) उभं असतं आहे असं सांगितलं तर कोणालाही विश्वास बसणार नाही. आम्ही तुमची गंमत करतोय असं वाटेल पण हे खरं आहे. अमेरिकेत असं एक गावं आहे या गावातील प्रत्येक घराच्या दारात विमान उभं राहिलेलं दिसतं. आज आम्ही तुम्हाला याच गावाबद्दल सांगणार आहोत.
अमेरिकेतलं एअरपार्क गाव (USA Air Parks Village). एका टिकटॉक युझरनं (Tiktok User) या गावाचा एक व्हिडिओ शेअर केला तेव्हापासून सोशल मीडियावर (Social media) या गावाची जोरदार चर्चा होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल कारण या गावातील प्रत्येक घराच्या समोर विमान उभं राहिलेलं दिसत आहे.
View this post on Instagram
आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की असं कसं घरासमोर विमान उभं करायची परवानगी दिली असेल? एवढी विमानं आली तरी कुठून? तर यामागे एक कारण आहे.
हे वाचा - ऑर्डर कॅन्सल केली म्हणून आला राग; डिलिव्हरी बॉयने महिलेसोबत काय केलं पाहा VIDEO
नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने एक निर्णायक भूमिका बजावली होती. अमेरिकेत 1939 सालापर्यंत 34 हजार पायलट होते. मात्र 1946 मध्ये पायलटची संख्या मोठ्या संख्येने वाढून 4 लाखांपेक्षा जास्त झाली. ज्यावेळी महायुद्ध संपलं तेव्हा अनेक एअरफील्ड आणि पायलट नोकरीतून मोकळे झाले. याचा सामना करण्यासाठी अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासननं (The Civil Aeronautics Administration) निवासी एअरपार्क्स तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला. या अंतर्गत बंद पडलेल्या मिलिट्री एअरस्ट्रीप्सवर सेवानिवृत्त झालेल्या पायलटांची राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारच्या वस्तीला 'फ्लाय-इन कम्युनिटिज' असं म्हटलं जातं. याठिकाणी प्रत्येक घरासमोर कारच्या जागेवर विमानं पाहायला मिळतात.
हे वाचा - 'विमानात विनामास्क आल्यास थेट खाली उतरवा'; उच्च न्यायालयाची सूचना
महत्त्वाचं सांगायचं झालं तर अमेरिकेच्या या एअरपार्कमधील रस्ते खूप रुंद आहेत. या रस्त्यावरून एक विमान आणि कार एकमेकांना न धडकता जाऊ शकतात. दरम्यान जगभरामध्ये जवळपास 630 पेक्षा जास्त एअरपार्क आहेत. यामधील 610 एअरपार्क एकट्या अमेरिकेत आहेत.
दरम्यान अशाच प्रकारचं एअरपार्क कॅलिफोर्नियातदेखील आहे. कॅमेरून पार्क एअरपोर्ट याच निवासी एअरपार्कपैकी एक आहे. नुकताच thesoulfamily नावाच्या एका टिकटॉक युझर्सने याठिकाणचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये प्रत्येक घरासमोर कारच्या ऐवजी विमान पहायाला मिळतं. कॅलिफोर्नियातील Sierra Sky Park हे पहिलं एअरपार्क आहे ज्याची स्थापना 1946 साली करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: International, Social media viral, Tik tok