मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Amazing चक्क फेकलेल्या मास्क पासून डिझायनरने तयार केला Wedding ड्रेस

Amazing चक्क फेकलेल्या मास्क पासून डिझायनरने तयार केला Wedding ड्रेस

क्रिएटिव्हिटीचा वापर करत फेकण्यात आलेल्या 1500 मास्कचा आणि पीपीई किटचा वापर करून ब्रायडल ड्रेस(Bridal dress) बनवला आहे.

क्रिएटिव्हिटीचा वापर करत फेकण्यात आलेल्या 1500 मास्कचा आणि पीपीई किटचा वापर करून ब्रायडल ड्रेस(Bridal dress) बनवला आहे.

क्रिएटिव्हिटीचा वापर करत फेकण्यात आलेल्या 1500 मास्कचा आणि पीपीई किटचा वापर करून ब्रायडल ड्रेस(Bridal dress) बनवला आहे.

  मुंबई, 20 जुलै-  मास्क(Mask), सॅनिटायझर(Sanitizer) या वस्तू कोरोना काळात (Covid-19) जीवनावश्यक वस्तूंमध्ये गणल्या जात आहेत. मास्क वापरणं जगभरात अपरिहार्य मानलं जात आहे. अशा काळात ब्रिटनमधील एका डिझायनरने मास्क आणि पीपीई किटचा(PPE Kit) वापर करून नववधूसाठीचा आकर्षक ड्रेस बनवला आहे. जाणून घेऊया या जगावेगळ्या ड्रेसबद्दल.

  दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाचा कहर सहन करत आहे. जगभरातील लोक कोरोनापासून मुक्तता मिळण्यासाठी नवनवीन उपाय, संशोधन करत आहेत. तर जे देश कोरोनामुक्त झाले आहेत अशा देशांमध्ये मास्कची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न उद्भवत आहे. ब्रिटनमधील Hitched वेबसाईटच्या म्हणण्यानुसार तिथे जवळजवळ 100 कोटींपेक्षा जास्त मास्क वापरून फेकून देण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील डिझायनर टॉम सिल्वरवूड(Tom Silverwood) याने त्याच्या क्रिएटिव्हिटीचा वापर करत फेकण्यात आलेल्या 1500 मास्कचा आणि पीपीई किटचा वापर करून ब्रायडल ड्रेस(Bridal dress) बनवला आहे. जो ड्रेस चर्चेचा विषय ठरला असून तुम्हालाही तो ड्रेस आकर्षित करेल. यात वापरण्यात आलेले मास्क हे अपसायकल म्हणजे पुनर्वापर करण्याजोगे स्वच्छ केलेले पांढऱ्या रंगाचे मास्क आहेत.

  टॉम सिल्वरवूड यांच्या या क्रिएटिव्ह ड्रेससाठी Hitched या वेडिंग प्लॅनर वेबसाईटने फंडिंग केले आहे. कोरोनापासून मुक्त झाल्याने ब्रिटनमधील लोक कोरोनापासून मिळालेल्या स्वातंत्र्याचे सेलिब्रेशन करत आहेत. याच निमित्ताने Hitched वेबसाईटने हा ड्रेस लाँच केला आहे. तिथे सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. हा ड्रेस सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

  (हे वाचा: OMG! बोट आहे की जादूची छडी? तरुणाच्या इशाऱ्यावरच कसे नाचतात उंदीर पाहा VIDEO)

  पहिल्यांदा कुणी परिधान केला हा कोरोना ड्रेस?

  टॉम सिल्वरवूड या डिझायनरने डिझाइन केलेला ड्रेस ब्रिटनमधील मॉडेल जेमिमा हैमब्रो (Jemima Hambro) हिने परिधान केला आहे. याचं फोटोशूट लंडनमधील पॉल्स कॅथेड्रलमध्ये (St Paul’s Cathedral, London) झालं आहे. कंबरेजवळच्या भागाला उठाव (highlight) देण्यासाठी या ड्रेसमध्ये डिस्पोजल पीपीई किटचा वापर करण्यात आला आहे. पांढऱ्या मास्कपासून बनवलेला हा ड्रेस जुन्या मास्कपासून बनवला आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण तेवढा आकर्षकरित्या तो बनवला गेला आहे.

  (हे वाचा: सोशल मीडियावरुन मुलीच्या लग्नाची मिळाली बातमी; VIDEO पाहून आई-बाबा हादरलेच!)

  काय आहे ब्रिटनमधील फ्रीडम डे?

  कोरोनाकाळात संपूर्ण जगभरात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू असल्याने लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांना परवानगी नव्हती. लॉकडाउन उठल्यानंतर काही प्रमाणाच्या लोकसंख्येने या कार्यक्रमांना परवानगी मिळाली परंतु मास्क लावणं किंवा काही ठिकाणी पीपीई किट घालणंदेखील बंधनकारक होतं. या सर्व गोष्टींना संपूर्ण जग कंटाळलं आहे पण कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हे नियम पाळणे गरजेचे होते. पण ब्रिटनमध्ये मात्र कोरोना अटोक्यात आल्यामुळे तिथे हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांना स्वातंत्र्य मिळाल्याची अनुभूती येते आहे त्यामुळेच ते ब्रिटनमध्ये फ्रीडम डे साजरा करत आहेत. सध्या तिथं लग्नाचा सिझन आहे त्यामुळे नववधूंना हा ड्रेस परिधान करायची इच्छा आहे आणि त्या हा ड्रेस विकत घेत आहेत.

  First published:

  Tags: Corona, Face Mask, Wedding