मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! बोट आहे की जादूची छडी? तरुणाच्या इशाऱ्यावरच कसे नाचतात उंदीर पाहा VIDEO

OMG! बोट आहे की जादूची छडी? तरुणाच्या इशाऱ्यावरच कसे नाचतात उंदीर पाहा VIDEO

तरुण आपल्या बोटांनीत उंदरांना कंट्रोल करतो.

तरुण आपल्या बोटांनीत उंदरांना कंट्रोल करतो.

तरुण आपल्या बोटांनीत उंदरांना कंट्रोल करतो.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 20 जुलै: माझ्या बोटात पॉवर (Finger power) आहे की नाही हे तपासत होते, अशा बऱ्याच तरुणींचे मजेशीर व्हिडीओ (Funny video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असल्याचं तुम्ही पाहिलं असतील. आता अशाच बोटाची जादू (Magic in finger) दाखवणाऱ्या एका तरुणाचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो आपल्या बोटांवर उंदरांना (Man control rats on finger) नाचवतो.

तसं तुम्ही सर्कशीत सिंह, वाघ, अस्वल, माकड यांना ट्रेनरच्या इशाऱ्यावर नाचताना पाहिलं असेल. पण कधी उंदरांना असं इशाऱ्यावर नाचताना पाहिलं आहे का? एका तरुणाने ते करून दाखवलं आहे.  तरुण आपल्या बोटांवरच उंदरांना कंट्रोल करताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ पाहून त्याचं बोट आहे की जादूची छडी असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

View this post on Instagram

A post shared by CRAZY JATTS (@crazy_jatts)

व्हिडीओत पाहू शकता, तरुणाकडे चार उंदीर आहे. सुरुवातीला तो एका उंदराला आपल्या एका बोटावर घेतो. तेव्हा हा उंदीर फिल्प मारताना दिसतो. त्यानंतर त्या उंदराला तो दूर फेकतो आणि पुन्हा आपल्या बोटांनी जवळ बोलवतो आणि त्याची जागा दाखवतो. उंदीर बरोबर तिथ जाऊन बसतो. इतर उंदरांसोबतसुद्धा तो तसंच करतो.

हे वाचा - VIDEO काढताना पाहून चवताळला हत्ती; धावत आला आणि...; पाहूनच भरेल धडकी

crazy_jatts इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करम्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक नेटिझन्सच्या पसंतीस पडला आहे. अनेकांचा यावर विश्वास बसत नाही. हे एक खास कौशल्य असल्याचं म्हणत सर्वांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे. तर काही युझर्सनी मात्र असं कुणालाही आपल्या बोटांवर नाचवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Shocking viral video, Social media viral, Viral, Viral videos