मराठी बातम्या /बातम्या /Viral /सोशल मीडियावरुन मुलीच्या लग्नाची मिळाली बातमी; VIDEO पाहून आई-बाबा हादरलेच!

सोशल मीडियावरुन मुलीच्या लग्नाची मिळाली बातमी; VIDEO पाहून आई-बाबा हादरलेच!

या मुलींना गावात राहू देणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

या मुलींना गावात राहू देणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

या मुलींना गावात राहू देणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

चंदीगड, 19 जुलै : पंजाबमधील (Punjab) जगराओ या गावात सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या मुलीच्या पालकांना सोशल मीडियावरुन आपल्या मुलीचं लग्न झाल्याची बातमी मिळाली. तो व्हिडीओ पाहून ते हैराण झाले. मात्र त्यांच्या हैराण होण्यामागे फक्त लग्न हेच कारण नाही. तर या गावात दोन मुलींनी एकमेकांशी लग्नगाठ बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शहरांमध्ये तसं अनेक ठिकाणी समलैंगिक लग्न (Gay marriage) होत असल्याचं आपणं ऐकतो. मात्र एका छोटाशा गावातील मुलींनीच हे पाऊल उचलल्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. (News of the girls marriage received from social media Parents tremble after watching VIDEO)

या दोघींच्या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघी एकमेकांना हार घालताना दिसत आहे. इतकच नाही तर एका मुलीने दुसरीला कुंकूदेखील लावला आहे. हा व्हिडीओ समोर येताच गावात खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला आहे. इतकच नाही तर कुटुंबीयांनीही मुलींचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात गावातील सरपंचाने सांगितलं की, अशा कृत्यामुळे आजूबाजूचं वातावरणही बिघडतं. त्यामुळे या मुलींना गावात राहू देणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

हे ही वाचा-VIDEO : नवरीचा चेहरा पाहताच हादरला नवरदेव; वरमाळा फेकून देत काढला मंडपातून पळ

या दोन्ही मुलींनी घरात कोणालाही त्यांच्या लग्नाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. तर परस्पर जाऊन त्यांनी देवळात लग्नगाठ बांधली. सध्या त्यांच्या लग्नाचा विषय गावात चर्चिला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Marriage, Punjab