मुंबई, 17 मार्च : वजन (Weight) कमी करणं हे आजकाल अनेकांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. बदललेली जीवनशैली, जंक फूड खाण्याचं वाढतं प्रमाण यामुळे आजकाल लठ्ठपणा (Obesity) ही गंभीर समस्या बनली आहे. आजूबाजूला नजर टाकली तरी मोठ्या संख्येनं लठ्ठ माणसं दिसून येतात. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. वेगवेगळ्या पद्धतीचं डाएट (Diet ), व्यायाम (Exercise) करतात त्यानंही फरक नाही पडला, तर शस्त्रक्रियाही करून घेतात. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारीही (Health Problems) उद्भवतात त्यामुळे वेळीच वजन कमी करणं अत्यंत आवश्यक असतं. 17 वर्षांच्या शौनक सिध्दार्थ सामंत (Shonak Siddharth Samant) याचं वजन तब्बल 130 किलो झालं होतं. वजन कमी करणं अत्यावश्यक होतं, त्यासाठी त्यानं प्रयत्न करायला सुरुवात केली. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला. जंक फूड खाणं सोडून दिलं. डाएट आणि वर्कआउट याच्या सहायानं आपण वजन कमी केल्याचं शौनक यानं एनबीटीशी बोलताना सांगितलं.
जाडपणामुळे त्याला आपली ताकद कमी झाल्यासारखं वाटत होतं. तसंच आपल्याला काही आजार होतील, अशी भीतीही वाटत होती. त्यासाठी त्यानं वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि व्यायामासह डाएटवरही लक्ष दिलं. या काळात त्यानं रात्रीचं जेवण बंद केलं. 20 तासांचा उपवास केला. पाणी आणि ग्रीन टी यांचंच सेवन केलं. शौनकनं आपल्या डाएट आणि व्यायामाबाबत सविस्तर माहिती दिली.
डाएटमध्ये बदल : शौनकनं आपल्या डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केला. त्याच्या ब्रेकफास्टमध्ये दोन उकडलेली अंडी, हाफ चिकन ब्रेस्ट, सॅलड आणि 300 मिली सोया दुधाचा समावेश होता. दुपारच्या जेवणात तो सोया चंक्स किंवा ग्रिल्ड पनीर किंवा चिकन ब्रेस्टसह डाळ किंवा भाज्या घेत असे. वर्कआउट आधी शुगर फ्री डार्क चॉकलेटचे तीन बाईट घेत असे, तर वर्क आउटनंतर केवळ दोन लिटर पाणी पीत असे. सोया, मिक्स डाळी, इडली सांबार, आचारी पनीर अशा कमी कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात केला.
(हे वाचा:OMG! इतकी लठ्ठ झाली की नेण्यासाठी अॅम्ब्युलन्सऐवजी फायर ब्रिगेडचीच गाडी आली )
सकारात्मक विचार आवश्यक : व्यायामासाठी शौनक रोज पायी चालतो (Walking). त्यासह 30 मिनिटं स्ट्रेंग्थ ट्रेनिंग (Strength Training) करतो. यामध्ये योग स्कॉटस, प्लंक, पुश अप्स, क्रंचेस आणि श्वसनाच्या व्यायामांचा समावेश आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी डाएट आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं असून व्यवस्थित झोप (Sleep) घेणंही आवश्यक आहे. त्याचबरोबर सकारात्मक विचारही (Positive Thinking) अत्यंत महत्त्वाचे आहेत, असा सल्ला शौनक सामंत यानं दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fat, Fitness, Health, Health Tips, Obesity, Sleep benefits, Wellness