मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! इतकी लठ्ठ झाली की रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सऐवजी फायर ब्रिगेडची गाडीच आली

OMG! इतकी लठ्ठ झाली की रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सऐवजी फायर ब्रिगेडची गाडीच आली

ही महिला इतकी लठ्ठ (obese woman) झाली आहे की, 25 दिवसांपासून कुशीदेखील बदलू शकली नाही.

ही महिला इतकी लठ्ठ (obese woman) झाली आहे की, 25 दिवसांपासून कुशीदेखील बदलू शकली नाही.

ही महिला इतकी लठ्ठ (obese woman) झाली आहे की, 25 दिवसांपासून कुशीदेखील बदलू शकली नाही.

अहमदाबाद, 16 मार्च : लठ्ठ (obese) व्यक्तींना आपल्या शरीराची नीट हालचालही करता येत नाही. लठ्ठपणामुळे (obesity) त्यांना कित्येक समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला इतकी लठ्ठ (gujrat obese woman) झाली की तिला झोपल्यानंतर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरही हलणं शक्य नाही. गेल्या 25 दिवसांपासून ती एकाच कुशीवर आहे.

गुजरातच्या राजकोटमधील एक महिला 25 दिवसांपासून कुशीदेखील बदलू शकली नाही. 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या या महिलेचं वजन 300 किलोग्रॅम आहे.  अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, सरलाबेन असं या महिलेचं नाव आहे.  तिचं वजन इतकं वाढलं की ती हालचालही करू शकत नव्हती. सरलाबेनचं वजन किती आणि कसं वाढलं ते तिच्या घरातल्यांना माहितीच नाही.

तिचा नवरा दुबईत नोकरीला आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो घरीच आला नाही आणि  आता कोरोना निर्बंधांमुळे तिचा पती भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी एका एनजीओकडून मदत मागितली. सति सेवा एनजीओने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुबईहून त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीबाबत माहिती दिली आणि आपल्या पत्नीला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत मागितली.

हे वाचा - हद्दच झाली! बापालाही हवी स्लिम ट्रिम लेक; मरेपर्यंत फिट राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट

सरलाबेनला घरातून बाहेर काढणंही अशक्य होतं. तीन वेगवेगळ्या अॅम्ब्युलन्स बोलवण्यात  आल्या पण एकाही अॅम्ब्युलन्समध्ये ती राहत नव्हती. शेवटी फायर ब्रिगेडची गाडी बोलवण्यात आली आणि तिला त्यातून नेण्यात आलं. दहा लोकांनी धरून तिला उचललं आणि फायर ब्रिगेडच्या गाडीपर्यंत नेलं.

First published:
top videos

    Tags: Ahmedabad, Fat, Health, Lifestyle, Obesity, Wellness, Woman