मुंबई, 08 जुलै : कोरफडीच्या चांगल्या गुणधर्मांबद्दल (Aloe vera Benefits) तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल. यामुळे, लोक त्यांच्या आहारातदेखील कोरफडीचा समावेश करण्यास घाबरत नाहीत. औषधी गुणधर्मांबद्दल (Aloe vera Medicinal Use) माहिती झाल्यानंतर लोकांमध्ये कोरफडीचा वापर झपाट्याने वाढला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? कोरफडीचे सेवन काही परिस्थितींमध्ये हानिकारकदेखील ठरू शकते. कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी तिचे फायदे किंवा तोटे दोन्ही जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून ती वस्तू मर्यादित प्रमाणात वापरता येईल. कोरफडीमध्ये लेटेक्स आढळतो आणि त्याचा रस किंवा कोणत्याही स्वरूपात सेवन केल्यास पोटात जळजळ, वेदना आणि अॅलर्जीसारख्या समस्या दिसू शकतात. कोरफड कोणत्या परिस्थितीत हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊया. कोरफडीचे दुष्परिणाम (Aloe vera Side Effects) - MayoClinic च्या मते, कोरफडीचे जास्त सेवन हानिकारक असू शकते. काही दिवस 1 ग्रॅमपेक्षा जास्त वापरल्यास किडनी निकामी होऊ शकते. - अॅलोव्हेरा लेटेकचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कर्करोगदेखील होऊ शकतो. याशिवाय जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्याही दिसू शकतात. ज्यांना कोरफडीची अॅलर्जी (Aloe vera Allergy) आहे त्यांनी कोरफड खाणे टाळावेच.
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस, होईल जास्त फायदा- बऱ्याच लोकांना त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणे आणि त्वचेवर पुरळ येणे किंवा इरिटेशन आणि जळजळ यासारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. - कोरफडीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. जर रक्तातील साखरेची पातळी आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तरीदेखील कोरफड आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते. - यामध्ये असलेल्या रेचक प्रभावामुळे काही लोकांना अॅलर्जीचाही सामना करावा लागू शकतो. - जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर शरीरात डिहायड्रेशनदेखील होऊ शकते. तुम्हाला बारबेरीच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का? मधुमेह, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारात असते फायदेशीर - गर्भवती महिलांनी याचे सेवन करू नये, अन्यथा वेळेपूर्वीच प्रसव वेदना सुरू होऊ शकतात. यामुळे बाळाला जन्म देण्यासही अडचणी येऊ शकतात. - कोरफड शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी करू शकते.