मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तिशीच्या उंबरठ्यावरच्या स्त्रियांनी फॉलो करायला पाहिजेत ऐश्वर्याच्या 'या' 4 सिक्रेट ब्यूटी टिप्स!

तिशीच्या उंबरठ्यावरच्या स्त्रियांनी फॉलो करायला पाहिजेत ऐश्वर्याच्या 'या' 4 सिक्रेट ब्यूटी टिप्स!

ऐश्वर्या चाळिशीतही ब्युटी क्वीनचं सौंदर्य टिकवूनआहे.

ऐश्वर्या चाळिशीतही ब्युटी क्वीनचं सौंदर्य टिकवूनआहे.

गणेशोत्सवासारख्या सणासुदीला नुसता मेकअप करून एक दिवसापुरती त्वचा किंवा सौंदर्य खुलवता येत नाही. त्यासाठी नियमित काळजी घ्यायला हवी. विशेषतः तिशीनंतर तर काही गोष्टी करायलाच हव्यात.

मुंबई, 9 सप्टेंबर: बॉलिवू़डमध्ये सध्या आलिया, कियारा या तरुण अभिनेत्रींचा जलवा असला तरी, जेव्हा गोष्ट सौंदर्याची येते तेव्हा  सर्वांच्या डोळ्यासमोर ऐश्वर्या राय - बच्चन (aishwarya rai bachchan beauty secrets)  हे  एकच नाव येतं. वयाची तिशी पार केलेली ही अभिनेत्री आजही तितकीच सुंदर दिसते जितकी ती विशीत दिसत होती. प्रत्येकाला प्रश्न पडतो की ऐश्वर्या राय - बच्चनच्या सुंदरतेचं नेमकं रहस्य आहे तरी काय?  सुंदरता टिकून राहण्यासाठी ऐश्वर्या काही ब्यूटी टिप्सचं नियमित पालन करते.

तिच्या या ब्यूटी टिप्स एकदम पॉकेट फ्रेंडली आहेत. म्हणजे अगदी कुणीही फॉलो करू शकतो असेच हे उपाय आहेत.

Fit आणि Healthy म्हणजे सारखं नव्हे; समजून घ्या या दोन्हीमधील छोटासा फरक

तुम्ही जर वयाच्या तिशीमध्ये प्रवेश केला असेल किंवा करणार असाल तर या 4 ब्यूटी टिप्स (beauty tips) नक्की फॉलो करा, कारण चाळिशीत प्रवेश करूनही तुम्ही देखील ऐश्वर्या राय - बच्चनसारखं सुंदर आणि तरुण दिसाल हे मात्र नक्की आहे.

भरपूर पाणी पिणे आणि हेल्दी आहार

ऐश्वर्या राय - बच्चन आपलं शरीर हाइड्रेट करण्यासाठी भरपूर पाणी पिती. यामुळे त्वचा टवटवीत राहण्यासाठी मदत होते. यामुळे त्वचेला एक वेगळी चमख प्राप्त होते त्यामुळे आपले वय दिसून येत नाही. तसेच ऐश्वर्या नेहमी सात्वीक, व्हिटामीनचे प्रमाण भरपूर असलेला आहार घेते.  केस  व त्वचा चांगली ठेवण्यासाठी हा आहार उपयोगी पडतो.  तसेत ऐश्वर्या बाहेरचे खाणे म्हणजे जंक फूड खाणे टाळते. या टिप्समुळे आजमुळे ती सुंदर अगदी विशीत दिसावी तसीच दिसती.

होममेड मास्क

ऐश्वर्या राय - बच्चन  पहिल्यापासूनच DIY मास्कचा वापर करत आली आहे. तिचा आवडता फेस पॅक बेसनाचा आहे. डाळीच्या पिठामध्ये दुधाची साय आणि चिमूटभर हळद मिळसून ती हा पॅक तयार करते आणि लावते.  तसंच दूध आणि बदाम तेलापासून देखील ती पॅक बनवून वापरते. स्किन मालिश करण्यासाठी ऐश्वर्या दही आणि मधाचा वापर करते. हे सगळे पॅक आपण देखील घरातील साहित्यापासून बनवून वापरू शकतो.

अरोमा थेरपी

त्वचेचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर ती चिंता, टेन्शन आहे.  सततच्या टेन्शनमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकत्या दिसायला लागतात. सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठी ऐश्वर्या अरोमाथेरपी घेती.

Nutrition Week 2021: अशी ओळखा भाज्या, हळद, मीठ आणि दुधातली भेसळ

यासाठी ती चंदनाच्या तेलाचा वापर करते.  अरोमा थेरपीमुळे मानसिक आणि शारीरिक असा दुहेरी फायदा मिळतो. चिंता, स्ट्रेस कमी करण्यास अरोमा थेरमी मदत करते असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

तेल मालिश किंवा तेल चंपी

वाढत्या वयासोबत  महिलांना केस गळतीच्या समस्येला देखील तोंड द्यावे लागत असते. ऐश्वर्या देखील तिचे केस मजबूत आणि चमकदार तसेच स्वस्थ ठेवण्यासाठी तेलाने मालिश करून चंपी करते. तेल केसातील फॉलिकल्स आणि क्यूटिकल सेल्स प्रटेक्ट करण्यासाठी मदत करते. तेल चंपीमुळे केसामध्ये कोंडा देखील होत नाही. तसेच यामुळे केसाला चमख येण्यास देखील मदत होते.  तसेच ऐश्वर्या  तिच्या आहारत देखील अशाच फळांचा, भाज्यांचा समावेश करते ज्यामुळे केस वाढण्यास मदत होते.

या घरगुती चार टिप्समुळे ऐश्वर्या राय - बच्चनाच्या सुंदरता आजही टिकून आहे. आपण देखील तिसच्या उंबरट्यावर असाल तर या टिप्स वापरून आपस्या सौंदर्यात अधिक भर टाकू शकतो.

First published:

Tags: Aishwarya rai, Beauty queen, Beauty tips, Fashion, Ganesh chaturthi