मुंबई, 19 मार्च : कॅन्सरपैकी ब्रेस्ट कॅन्सर (Breast cancer) होण्याचं प्रमाण जगभरातील महिलांमध्ये जास्त आहे. अलिकडे स्तनाच्या कर्करोगात वाढ होऊ लागली आहे. याबद्दल महिलांमध्ये पुरेशी जागरूकता निर्माण झालेली आहे. पण तरीही अनेकदा संकोच, भीती, अज्ञान आणि अशिक्षितपणा यामुळे स्तन कर्करोगाबाबतचे गैरसमज निर्माण होतात आणि मग भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत न होता उशिरा होते. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने आजार बळावतो. म्हणूनच स्तनाच्य कर्करोगाबाबत गैरसमजूती दूर होणं गरजेचं आहे. जेणेकरून लवकर निदान आणि उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो.
ब्रेस्ट कॅन्सर होण्याची तशी अनेक कारणं आहेत. पण अनेक महिलांना वाटतं की डिओडरंट वापरल्यामुळेही कॅन्सर होतो. यात कितपत तथ्य आहे. याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहुया.
एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संयुक्त वैद्यकीय संचालक डॉ. धैर्याशील सावंत यांनी सांगितलं, डिओडोरंट्स आणि अंडर-वायर ब्राच्या वापरामुळे स्तन कर्करोग होत नाही. हे चुकीचं मत आहे की डीओडोरंट्समध्ये असलेले हानिकारक रसायने स्तनामध्ये असलेल्या पेशींमध्ये पसरतात ज्यामुळे कर्करोग होतो. शिवाय ब्रामुळे स्तनाचा कर्करोग होतो. परंतु, याबद्दल अद्याप कोणत्याही संशोधनातून समोर आलेलं नाही. त्यामुळे स्तनाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो हे जाणून घेतल्याशिवाय चुकीच्या गैरसमजुतींकडे लक्ष देणं योग्य नाही.
हे वाचा - कोरोना लशीने केली कमाल! प्रेग्नन्सीत आईचं लसीकरण; अँटीबॉडीजसह जन्माला आलं बाळ
डॉ. सावंत यांनी सांगितलं, कुटुंबात एखाद्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग असल्यास अन्य महिलेला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पण हे प्रमाण केवळ 5 टक्के इतकंच आहे. कर्करोगाबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, काही स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा कोणताही कौटुंबिक इतिहास नसताना सुद्धाकर्करोग झालेला आहे. फक्त रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो, हेसुद्धा खरं नाही. सध्या तरुण मुलींनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. सध्या, स्तनाचा कर्करोग सामान्यत: 50 वर्षांखालील तरुण स्त्रियांमध्ये दिसून येतो. म्हणूनच प्रत्येक वयोगटातील महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
हे वाचा - अजब! 5 इंच लांबीचं मधलं बोट असलेल्या मुलीचा VIDEO VIRAL
सध्या बऱ्याच महिलांना स्तनात वेदना जाणवते. मासिक पाळी संपल्यानंतर ही वेदना नाहीशी होऊ शकते. स्तनातून स्त्राव निघत असल्यास स्तनाचा संसर्ग देखील होऊ शकतो. पण अनेक महिला स्तनाच्या वेदनेकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान आणि उपचार न मिळाल्यास आजार बळावू शकतो. म्हणूनच महिलांनी स्तनात वेदना जाणवत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चाळीशीतील प्रत्येक महिलांनी स्तनाचा कर्करोगाचे वेळीच निदान व्हावं, यासाठी मेमोग्राफी तपासणी करून घेणं गरजेचं आहे. मेमोग्रॉफीमुळे स्तनाचा कर्करोग होतो हा गैरसमज आहे. तसं काहीही होत नाही. त्यामुळे स्तनाची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेमोग्रॉफी करून घ्यावी, असा सल्ला डॉ. सावंत यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breast cancer, Cancer, Health, Lifestyle, Sexual wellness, Wellness, Woman