मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लसीकरणानंतर Polio संसर्गाची चिंता सोडा! nOPV2 लस cVDPV2 देणार टक्कर, WHO नेसुद्धा दिली मंजुरी

लसीकरणानंतर Polio संसर्गाची चिंता सोडा! nOPV2 लस cVDPV2 देणार टक्कर, WHO नेसुद्धा दिली मंजुरी

cVDPV2 विरोधात nOPV2 लशीच्या आपात्कालीन वापराला डब्ल्यूएचओने (WHO) मंजुरी दिली आहे.

cVDPV2 विरोधात nOPV2 लशीच्या आपात्कालीन वापराला डब्ल्यूएचओने (WHO) मंजुरी दिली आहे.

cVDPV2 विरोधात nOPV2 लशीच्या आपात्कालीन वापराला डब्ल्यूएचओने (WHO) मंजुरी दिली आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : लसीकरणानंतरही (Vaccination) संसर्गाचा धोका असतो. तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या पोलिओ (Oral polio vaccine) लसीकरणानंतर (Polio vaccination) अशीच प्रकरणं जगातील काही देशात वाढत आहे. त्यामुळे भारतातून पोलिओचा (Polio) पूर्णपणे खात्मा झाला असला तरी निर्धास्त राहून चालणार नाही. पण तरी आता चिंता करण्याचीही गरज नाही. कारण पोलिओ लसीकरणानंतर होणाऱ्या सीव्हीडीपीव्ही2 (cVDPV2) ला टक्कर देणारी एनओव्हीपीव्ही2  (nOPV2) ही नवी ओरल पोलिओ लस आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.

भारत पूर्णपणे पोलिओमुक्त आहे. गेल्या दोन अडीच वर्षात पी श्रेणीतील कोणताच व्हायरस सापडला नाही आणि व्हीडीपीव्हीचाही उद्रेक झालेला नाही. पण जर लशीमुळे निर्मित व्हायरसचा शिरकाव झाला तर परिस्थिती कठीण होईल.

भारतात दोन पोलिओ लशी दिल्या जातात. एक इंजेक्शनवाटे आईपीवी (IPV) आणि दुसरी तोंडावाटे ड्रॉपने दिली जाणारी बीओपीवी (bOPV). या लशी पी1 आणि पी3 ला रोखू शकता. राहिला पी2 व्हायरस ज्यामुळे इम्युनिटी कमजोर होते. या व्हायरसने एकदा शिरकाव केला तर महासाथीचा धोका उद्भवू शकतो. ही महासाथ रोखण्यासाठी एक मोनोवेलेंट ओपीव्ही टूचा ड्रॉप बनवण्यात आला पण तो शरीरात जाऊन VDPV व्हायरस बनवतो. त्यामुळे अनेक ठिकाणी हा व्हायरस दिसून येतो. त्यामुळे अशा व्हायरस किंवा लशीची गरज होती जी VDPV मध्ये बदलणार नाही, जेनेटिकरित्या स्थिर असेल. nOPV2 ही अशीच लस आहे.

हे वाचा - 2 महिने प्रतीक्षा करण्याची गरज नाही; मुंबईकरांना 2-4 दिवसांतच समजणार कोरोनाचं बदलतं रूप

जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल एडव्हायझरी कमिटी फॉर वॅक्सिन सेफ्टीचे (GACVS)  सदस्य आणि भारतातील नॅशनल सर्टिफिकेशन कमिटी फॉर पोलिओ इरेडिकेशनचे (NCCPE) अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, हा व्हायरस सर्वात खतरनाक नाही. भारतातून 1999 साली या व्हायरसचा खात्मा झाला होता पण ओरल पोलिओ लस देत राहिल्याने VDPV2 व्हायरस पुन्हा होण्याची शक्यता वाढते जे खूप धोकादायक आहे. ओरल पोलिओ लशीमुळे होणाऱ्या दुष्परिणांमुळे निर्माण होणारा व्हायरस म्हणू शकतो. त्यामुळेच यासाठी दुसरी लस बनवण्याची गरज पडली.

हे वाचा - Explainer : Covishield लस कितपत प्रभावी? काय सांगतो जगातला सर्वात मोठा अभ्यास?

नोव्हेंबर 2020 मध्ये या लशीचं ट्रायल सुरू झालं. आता दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. आफ्रिका देश आणि आशियातील बांग्लादेश जिथं व्हीजीपीव्हीटूचा उद्रेक झाला आहे, तिथंच याचा वापर करण्यात आला आहे. ही लस नियमित लसीकरणात दिली जाणार नाही. सीव्हीडीपीव्ही टूचा उद्रेक झाल्यावर दिली जाईल. शिवाय संपूर्ण देशात ही लस दिली जात नाही तर जिथं उद्रेक झाला आहे, तिथंच ही लस दिली जाते.

First published:

Tags: Polio free, Vaccine, Virus, Who