मुंबई, 02 मे : रस्त्यावरून चालत जाताना अचानक पैसे पडलेले दिसतात. असे कधी ना कधी आपल्या सर्वांच्याच बाबतीत घडलेले असेल. हे पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करणे अनेकांना योग्य वाटते. हा पैसा, नाणी, नोटा काहीही असू शकतात, पण या पैशाचे करायचे काय, या संभ्रमात काही लोक राहतात. रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे अनेक गोष्टींचे संकेत असतात. एकंदरीत रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असतो. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्याकडून जाणून (Getting money lying on the street is auspicious or inauspicious) घेऊया, रस्त्यावर पडलेले पैसे मिळणे शुभ आहे की अशुभ? -असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर पडलेले नाणे मिळाले तर तो लवकरच काही नवीन काम सुरू करू शकतो आणि हे नवीन काम त्या व्यक्तीला यश आणि आर्थिक संकटांपासून मुक्ती देईल. - असेही मानले जाते की, रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे म्हणजे, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. जर तुम्ही कोणत्याही स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करत असाल तर त्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. - असेही सांगितले जाते की, ज्या लोकांना अचानक एखादी नोट रस्त्यावर पडलेली सापडते, अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहते. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येत नाहीत. हे वाचा - उन्हाळ्यात COOL राहण्यासाठी मलायका अरोरानं सांगितली 3 योगासनं; तुम्हीही करून बघा - जर एखादी व्यक्ती काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असेल आणि त्या व्यक्तीला वाटेत पैसे पडलेले दिसले, तर हे सूचित होते की, तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. - एखाद्या व्यक्तीला त्याच्या ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणाहून परतताना रस्त्यात पैसे पडलेले दिसले, तर ते तुम्हाला आगामी काळात आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. हे वाचा - भूक मंदावण्याचा प्रॉब्लेम उन्हाळ्यात होतोच; हे 5 घरगुती उपाय भूक वाढवतील - जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यात अचानक पैशांनी भरलेली पर्स/पाकीट दिसले, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच कोणती तरी खूप चांगली घटना घडणार असल्याचे लक्षण आहे. असेही मानले जाते की पैशाने भरलेली पर्स दिसणे म्हणजे तुम्हाला तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती मान्यतेवर आणि संबंधित ज्योतिषांनी आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याशी सहमत आहे असे नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.