बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची स्मार्ट खेळी; Laxmmi Bomb Trailer मध्ये काय केलं पाहा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची स्मार्ट खेळी; Laxmmi Bomb Trailer मध्ये काय केलं पाहा

इतर फिल्मच्या ट्रेलर्सप्रमाणे Laxmmi Bomb Trailer ला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागू नये, म्हणून आधीच कशी खबरदारी घेण्यात आली आहे पाहा.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर :  अभिनेता अक्षय कुमार  (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणीची (Kiara Advani) फिल्म लक्ष्मी बॉम्बचा (Laxmmi Bomb) ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर (Laxmmi Bomb Trailer) रिलीज होतात सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा होते आहे ती या ट्रेलर्सच्या  Like आणि Dislike नंबर्सची. या फिल्मच्या ट्रेलर्सच्या व्हिडीओवर लाइक आणि डिसलाइकचे नंबर्सच दिसत नाही आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रिलीज झालेल्या बहुतेक बॉलिवूड फिल्म्सविरोधात चाहत्यांनी सोशल मीडियावर जणू मोहीमच सुरू केले आहे. काही चित्रपटांचे ट्रेलर्स सर्वात जास्त डिसलाइक करण्यात आले आहे. आता अक्षय कुमारच्या फिल्म लक्ष्मी बॉम्बही बॅन करावा अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली. त्यातच आता फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र या ट्रेलरला चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागू नये म्हणून अक्षय कुमारने स्मार्ट खेळी केली आहे.

अक्षय कुमारच्या या हॉरर कॉमेडी फिल्मची प्रतीक्षा लोकांना कित्येक दिवसांपासून होती. मात्र लॉकडाऊनमध्ये थिएटर्स बंद असल्याने या फिल्म्सची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरच ही फिल्म रिलीज होणार आहे. दरम्यान 14 जूनला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. विशेषतः स्टार किड्सच्या फिल्म्सवर निशाणा साधला जातो आहे.

याआधी महेश भट्ट दिग्दर्शित आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय यांची फिल्म सडक 2 तसंच इशान खट्टर आणि अनन्या पांडेची फिल्म खाली पीलीला नेटिझन्सनी लक्ष्य केलं. लक्ष्मी बॉम्बमध्ये कुणी स्टारकिड्स नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि सुशांत सिंह राजपूतबाबत पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर लक्ष्मी बॉम्बही बॅन करावा, अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली. लोकांच्या भावना पाहत मेकर्सनी असं पाऊल उचललं आहे.

हे वाचा - बरसने आ रही है लक्ष्मी; अक्षय कुमारच्या Laxmmi Bomb चा धमाकेदार Trailer

लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) 9 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये प्रदर्शित होतोय. OTT प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर (Hot Star) हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार (Akshay kumar new movie) या चित्रपटात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारत आहे.‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या या भूमिकेचं नाव लक्ष्मी असं आहे.

हे वाचा - ड्रग्जप्रकरणी दीपिकाच्या चौकशीनंतर रणवीर व्यक्त; PM मोदींचा उल्लेख करत TWEET

अक्षय कुमारसोबतच (Akshay Kumar) कियारा अडवाणी (Kiara Advani), तुषार कपूर (Tushar Kapoor), शरद केळकर (Sharad Kelkar) असे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये झळकणार आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. लक्ष्मी बॉम्बनंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या सिनेमामध्ये अक्षय कुमार झळकणार आहे. त्यासोबतच पुढील वर्षात हेराफेरी 3, अतरंगी रे, बच्चन पांडे, बेल बॉटम ह्या चित्रपटातही अक्षय दिसणार आहे.

Published by: Priya Lad
First published: October 9, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या