ड्रग्जप्रकरणी दीपिकाच्या चौकशीनंतर रणवीर सोशल मीडियावर व्यक्त; PM मोदींचा उल्लेख करत TWEET
अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukon) ड्रग्जप्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) सोशल मीडियावर मौन बाळगलं होतं. आता त्याने पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे.
मुंबई, 09 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ड्रग्ज अँगलने तपास करताना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. अनेक बड्या सेलिब्रिटींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) चौकशी केली. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचीही ((Deepika Padukone) चौकशी झाली. दीपिकाच्या चौकशीनंतर तिचा नवरा आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झालं आहे. यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे.
रणवीर सिंहने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर शेवटचं ट्वीट केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात दीपिकाचं नाव समोर आल्यानंतर त्याने मौन बाळगलं होतं. सोशल मीडियावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता तो सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. त्याने पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या कोरोनाविरोधातील मोहिमेबाबत ट्वीट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी #Unite2FightCorona ही मोहीम सुरू केली. कोरोनाच्या लढ्यात सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. रणवीरने मोदींचं हे ट्वीट रिट्वीट केलं आहे आणि या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. त्यानेदेखील सर्वांना चला एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढू असं आवाहन केलं आहे.
दरम्यान ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली दीपिका पादुकोण आता शूटिंगसाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती सूटिंगसाठी गोव्याला रवाना होणार आहे. आता दीपिका गोव्यामध्ये शकुन बत्रा यांच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी जाणार आहे. NCBने चौकशीसाठी बोलवल्यामुळे दीपिकाला गोव्यातलं शूट अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं होतं. या सिनेमात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचीसुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे. गोव्यामध्ये गेले अनेक दिवस सिनेमाचं शूट सुरू होतं. पण दीपिकाचं नाव ड्रग्ज कनेक्शनसोबत जोडलं गेल्यामुळे तिला शूट अर्धवट सोडून यावं लागलं होतं. दीपिकाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा सिनेमाचं शूट सुरू होतं अशी माहिती मिळत आहे. अनन्या आणि सिद्धार्थवर चित्रित केले जाणारे सिन यावेळी पूर्ण करुन घेण्यात आले.
2017 साली दीपिकाने ड्रग्जच्या मागणीसंदर्भात केलेलं चॅट उघडकीस आलं होतं. या चॅटमध्ये तिने आपली मॅनेजर करिश्माकडे ‘माल’ आहे का अशी विचारणा केली होती. या चॅटमुळे दीपिकाची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. मी सुद्धा या चॅटचा एक भाग आहे हे दीपिकाने कबूल केलं होतं. या चौकशीनंतर दीपिकाचा फोनही जप्त करण्यात आला होता. ड्रग्ज कनेक्शनसंदर्भात दीपिकाला अद्यापही क्नीनचीट देण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळत आहे.