Home /News /entertainment /

बरसने आ रही है लक्ष्मी; अक्षय कुमारच्या Laxmmi Bomb चा धमाकेदार Trailer

बरसने आ रही है लक्ष्मी; अक्षय कुमारच्या Laxmmi Bomb चा धमाकेदार Trailer

अभिनेता अक्षय कुमारची (Akshay kumar) फिल्म 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर (Laxmmi Bomb Trailer) रिलीज झाला आहे.

  मुंबई,09 ऑक्टोबर :  बरसने आ रही लक्ष्मी, अशा दमदार डायलॉगसह अभिनेता अक्षय कुमारची (Akshay kumar) फिल्म 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmmi Bomb) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने (Laxmmi Bomb Trailer) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अक्षयच्या चाहत्यांना या फिल्मची प्रतीक्षा होती. कारण अक्षय कुमार यामध्ये वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्रामवर फिल्मचा ट्रेलर शेअर केला आहे. यामध्ये अक्षय ट्रान्सजेंडरच्या लूकमध्ये आहे.
  हा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शन लिहिलं आहे, 'लक्ष्मी बॉम्ब ऑफिशियल ट्रेलर, जहां कहीं भी हैं, वहीं रुक जाएं और तैयार हो जाएं देखने के लिए लक्ष्मी बॉम्ब का ट्रेलर, क्योंकि बरसने आ रही है लक्ष्मी.' हे वाचा - जायरा वसीमनंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं बॉलिवूड, म्हणाली... लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) 9 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये प्रदर्शित होतोय. OTT प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर (Hot Star) हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार (Akshay kumar new movie) या चित्रपटात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारत आहे.‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या या भूमिकेचं नाव लक्ष्मी असं आहे. हे वाचा - 'जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही',विलासरावांबद्दल बोलताना रितेश भावुक अक्षय कुमारसोबतच (Akshay Kumar) कियारा अडवाणी (Kiara Advani), तुषार कपूर (Tushar Kapoor), शरद केळकर (Sharad Kelkar) असे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये झळकणार आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. लक्ष्मी बॉम्बनंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या सिनेमामध्ये अक्षय कुमार झळकणार आहे. त्यासोबतच पुढील वर्षात हेराफेरी 3, अतरंगी रे, बच्चन पांडे, बेल बॉटम ह्या चित्रपटातही अक्षय दिसणार आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bollywood, Trailer

  पुढील बातम्या