मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Mask घाला अन् दुरावा मिटवा; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत नवं संशोधन

Mask घाला अन् दुरावा मिटवा; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत नवं संशोधन

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, याबाबत संशोधकांनी अभ्यास केला.

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, याबाबत संशोधकांनी अभ्यास केला.

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, याबाबत संशोधकांनी अभ्यास केला.

मुंबई, 17 मार्च :  कोविड-19 चा (coronavirus) संसर्ग होऊ नये यासाठी मास्क (mask) आणि सोशल डिस्टन्सिंग (social distancing) ठेवणं बंधनकारक आहे. दोन व्यक्तींमध्ये साधारणपणे 2 मीटर किंवा 6 फुटांचं अंतर असावं असं जगभरातील तज्ज्ञांनी सांगितलं आहे. पण जर या दोन व्यक्तींच्या तोंडावर मास्क असेल तर सोशल डिस्टन्सिंगच्या अंतरात बदल होणं शक्य आहे का? याबद्दल अमेरिकेतील शास्रज्ञांनी संशोधन केलं आहे. त्यानुसार जर दोन्ही व्यक्तींनी चेहऱ्यावर मास्क असेल तर त्या दोघांमधील सोशल डिस्टन्सिंगचं अंतर कमी ठेवता येऊ शकतं, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

हॉर्वर्ड विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बेथ इस्रायल डेकॉनेस मेडिकल सेंटर (BIDMC) मधील शास्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. एकमेकांजवळ असलेल्या दोन व्यक्तींनी मास्क लावला तर 3 फूट अंतर पुरेसं आहे, असं या अभ्यासात दिसून आलं. मास्क लावून तुम्ही परस्परांपासून 3 फूट अंतरावर बसलात तरीही ते 6 फूट अंतरावर असताना जितके कोरोना विषाणूपासून तितकेच तुम्ही सुरक्षित असता, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

मॅसेच्युसेटमधील सरकारी शाळांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. मॅसेच्युसेट्समधील 251 स्कूल डिस्ट्रिक्स्ट्समधील उपलब्ध डाटाचा या संशोधकांनी अभ्यास केला. 5 लाख 37 हजार 336 विद्यार्थी आणि 99 हजार 390 या अभ्यासात सहभागी झाले. सप्टेंबर 2020 ते जानेवारी 2021 यादरम्यान 16 आठवडे हा अभ्यास करण्यात आला. या शाळांतील स्टाफ, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिजिकल डिस्टन्सिंग आणि सर्व कोविडसंबंधी नियम पाळले होते. जिल्ह्यातील यंत्रणा, एनजीओ यांच्याकडून माहिती गोळा करण्यात आली.

हे वाचा - टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं राज्यात का वाढतोय कोरोना? ही असेल स्ट्रॅटेजी

6 फूट अंतर ठेवून वावरलेल्या शाळा आणि 3 फूट अंतर ठेवून वावरलेल्या शाळा यांच्यामध्ये कोविड संसर्गाच्या प्रमाणात फारसा फरक दिसून आला नाही. त्यामुळे असा निष्कर्ष समोर आला की शाळांमध्ये बसण्याच्या दृष्टिने जर परस्परांमध्ये 3 फुटांचं अंतर ठेवून ते बसले आणि त्याचा स्टाफ किंवा विद्यार्थ्यांच्या मनावर वेगळा परिणाम होणार नसेल तर त्या पद्धतीने बसायला हरकत नाही. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाऊ देण्याची परवानगी देण्याचा प्रशासन प्रयत्न करत असतानाच हे संशोधन प्रसिद्ध झाल्यामुळे त्याचं महत्त्व वाढलं आहे. शाळांच्या भवतालच्या लोकांनीही प्रत्यक्ष शाळा सुरू करायला पाठिंबा दिल्याचं निरीक्षणही यात नोंदवण्यात आलं.

हे वाचा - ब्लूट्यूथने फोनमध्ये पसरतो हा खास व्हायरस; Coronavirus ट्रॅक करण्यासाठी होते मदत

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार या अभ्यासाचे मुख्य अभ्यासक डॉ. पॉली व्हॅन डेन बर्ग म्हणाल्या, ‘या आधीच्या अभ्यासात प्रत्यक्ष शाळेत बसलेल्या विद्यार्थांमध्ये किती अंतर असावं याचा अभ्यास करण्यात आला नव्हता. या अभ्यासात असं लक्षात आलं की मास्क लावल्यानंतर 6 ऐवजी 3 फूट अंतरावर विद्यार्थी किंवा शिक्षक राहिले तरीही संसर्गाचं प्रमाण खूप वाढत नाही. तसंच जर सर्व मुलांना शाळेत बोलवायचं झालं तर सर्व जिल्ह्यांतील शाळांच्या इमारती इतक्या मोठ्या नाहीत की 6 फूट अंतर ठेवून त्यांना बसता येईल. त्यामुळे या संशोधनानंतर पालक, शिक्षक, विद्यार्थी सगळेच निर्धास्त होतील.’

First published:

Tags: Coronavirus, Mask, Social distancing