Home /News /lifestyle /

Shocking! रात्री लैंगिक संबंध, दुसऱ्या दिवशीच सकाळी 'प्रेग्नंट' व्हायची महिला; मेडिकल रिपोर्ट पाहून तर हादरलीच

Shocking! रात्री लैंगिक संबंध, दुसऱ्या दिवशीच सकाळी 'प्रेग्नंट' व्हायची महिला; मेडिकल रिपोर्ट पाहून तर हादरलीच

महिलेसोबत दररोज असं घडायचं आणि यामागील कारण धक्कादायक होतं.

लंडन, 22 डिसेंबर : रात्री लैंगिक संबंध (Physical relation) आणि सकाळीच प्रेग्नंट (Pregnant) होणं हे तुम्हाला वाचायलाही थोडं विचित्र वाचत असेल. पण इंग्लंडमधील महिलेच्या बाबतीत असं घडलं आहे. ही महिला रात्री आपल्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची. त्यानंतर तिच्या पोटात तीव्र वेदना व्हाययच्या आणि सकाळी तिचं पोट प्रेग्नंट महिलेसारखं मोठं व्हायचं (Woman pregnant everytime after physical relation). असं तिच्यासोबत नेहमी घडायचं. यामागील कारण समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. केटी सिम्स असं या 32 वर्षीय महिलेचं नाव असून ती इंग्लंडमधील डेव्हॉनमध्ये (Devon England) राहते. जेव्हा केटी आपल्या पतीसोबत सेक्स करायची तेव्हा तिला पोटामध्ये वेदना होत असत. इतकचं नाही तर दुसऱ्या दिवशी तिच्या पोटाचा घेरदेखील वाढत असे. पोटाचा घेर इतका वाढत असे की ती गरोदर (Pregnant) असल्यासारखी दिसत असे. अनेकदा तिच्या मित्र-मैत्रीणींच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आली होती. काहींना वाटे ती जाड झाल्यामुळे पोटाचा घेर वाढला आहे. सेक्शुअल अॅक्टव्हिटीमुळे पोटदुखी होत असेल, असा सुरुवातीला केटीचा समज होता. मात्र, नंतर तिला यामागे काहीतरी वेगळं कारण असल्याची जाणीव झाली. आपल्या पोटदुखीबाबत केटीनं डॉक्टरांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ तिच्या पित्ताशयाचं (Gallbladder) स्कॅन केलं. स्कॅननंतर धक्कादायक गोष्ट निदर्शनास आली. केटीच्या पोटामध्ये 10 सेंटीमीटर आकाराची एक गाठ होती. जिचं रुपांतर नंतर कॅन्सरमध्ये होऊ शकलं असतं. जेव्हा केटी आणि बेन सेक्स करायचे तेव्हा केटीच्या पोटातील गाठीवर दाब पडत असे आणि तिला तीव्र वेदनांचा सामना करावा लागे. हे वाचा - काहीही! खरंच असं कुणी फिट राहतं का? मॉडलचं फिटनेस सिक्रेट वाचूनच हैराण व्हाल नोव्हेंबर महिन्यात शस्त्रक्रिया (Surgery) करून केटीच्या पोटातील गाठ काढण्यात आली. केटीनं ही घटना सोशल मीडियावर शेअर केली असून लोकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. विशेषत: महिलांना वेळोवेळी आपली तपासणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना अशा संकटांचा सामना करावा लागणार नाही, असा सल्ला केटीनं दिला आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या वेदनांबाबत महिला लवकर डॉक्टरांना सांगत नाहीत. परिणामी वेदना वाढत जाऊन दुर्धर आजार होतात. कधी-कधी तर जीवदेखील गमवावा लागतो. त्यामुळं महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे वाचा - मुलींच्या लग्नाच्या वयावरुन वाद! मात्र प्रेग्नेन्सीसाठी योग्य वय काय आहे? कॅन्सर (Cancer) हा असा आजार आहे, ज्यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपी (Chemotherapy) सारख्या उपचार पद्धतींचा वापर करून तो थोपवता येतो. पहिल्या दोन स्टेजनंतर मात्र, कॅन्सवर मात करणं जवळपास अशक्यच आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle, Pregnant, Sex

पुढील बातम्या