Home /News /lifestyle /

Marriage Age and Fertility: मुलींच्या लग्नाच्या वयावरुन वाद! मात्र प्रेग्नेन्सीसाठी योग्य वय काय आहे?

Marriage Age and Fertility: मुलींच्या लग्नाच्या वयावरुन वाद! मात्र प्रेग्नेन्सीसाठी योग्य वय काय आहे?

Photo: AFP_Relaxnews / vgajic / Istock.com

Photo: AFP_Relaxnews / vgajic / Istock.com

आतापर्यंत आपल्या देशात (India) मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय (Girl's Legal Age for Marriage) 18 वर्षे होते; मात्र आता केंद्र सरकारने (Central Government) ते 21 वर्षे करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर : आतापर्यंत आपल्या देशात (India) मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय (Girl's Legal Age for Marriage) 18 वर्षे होते; मात्र आता केंद्र सरकारने (Central Government) ते 21 वर्षे करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयावरून देशात राजकीय, सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून, मुलींच्या लग्नाचे वय वाढवल्याबद्दल विरोधी पक्ष (Opposition Political Parties)सरकारवर कडाडून टीका करत आहेत. या निर्णयामागची सरकारची भूमिका आणि त्याचे परिणाम याविषयी उहापोह सुरू आहे. या सगळ्या चर्चेतील सर्वात मोठा प्रश्न असा आहे की गर्भधारणेचे नेमके योग्य वय काय आहे? त्याबाबत सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. मातृत्व (Motherhood)हा स्त्रीचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यामुळे गर्भधारणा (Pregnancy)कधी होऊ द्यायची याचा निर्णय घेण्याचा तिला अधिकार असला तरी आपल्या देशात मातृत्व ही स्त्रीच्या सामाजिक स्थानाशी जोडलेली बाब असल्याने स्त्रीला हा अधिकार वापरता येण्याची संधी फार कमी मिळते. पूर्वीच्या काळात बालविवाहाचे प्रमाणही अधिक होते, त्यामुळे अनेक मुलींना लहान वयातच गर्भारपण, मातृत्वाच्या ओझ्याला सामोरे जावे लागत असे. मुलीच्या लग्नाचे वय 18 केल्यानंतर त्यात थोडी सुधारणा झाली तरीही 18 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर लगेचच मुलं होण्याबाबत दबाव टाकला जाई. त्यामुळे शिक्षण घेण्याच्या काळात मुलींना मातृत्वाची जबाबदारी पार पाडावी लागे. त्यासाठी त्या मानसिक, शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत का, तयार आहेत का याची दखल घेण्याची सजगता फार कमी आहे. त्यामुळे गर्भारपणात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गर्भधारणेसाठी योग्य वय काय असते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हेल्थलाइन डॉट कॉमच्या अहवालानुसार (Healthline.com),वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता (Fertility)नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत, मोठ्या वयात स्त्रियांनी मुलाचे नियोजन (Pregnancy)करणे धोक्याला आमंत्रण देणारे असते. परंतु असे देखील म्हटले जाते की गर्भधारणेचे असे कोणतेही 'उत्तम वय' (Best Age)नसते. तुमचे वय 30 किंवा 40 वर्षे आहे म्हणजे तुम्हाला निरोगी बाळ (Heathy Baby)होऊ शकत नाही,असा अर्थ होत नाही किंवा तुम्ही कुटुंब सुरू करू शकत नाही असा नाही. कुटुंब सुरू करण्याचा निर्णय तुमचे वय आणि तुम्ही पालक होण्यासाठी मानसिकदृष्ट्या किती तयार आहात, अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. वयाच्या 20 व्या वर्षी स्त्रिया गर्भधारणेसाठी अधिक सक्षम असतात. या वयात स्त्रीच्या शरीरात सर्वाधिक बीजांडे तयार होत असतात आणि या वयात गर्भधारणेशी संबंधित जोखीमदेखील (Risk)कमी असते. 25 वर्षाच्या वयात गर्भधारणेसाठी 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रयत्न करावा लागण्याचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे ही वाचा-वजन कमी करण्यापासून ब्लड सर्कुलेशनही राहिल नीट;हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे हेल्थलाइनच्या अहवालानुसार, वयाच्या 32 व्या वर्षानंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते तर 35 व्या वर्षांनतर ती अधिक वेगाने कमी होऊ लागते. स्त्रियांच्या आयुष्यात सर्वाधिक बीजांडे निर्माण होण्याच्या वयात बीजांडाची संख्या सुमारे 10 लाख असते. वयाच्या 37 व्या वर्षी ही संख्या सुमारे 25 हजारांवर येते. त्यामुळं जेव्हा एखादी महिला 35व्या वर्षानंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असेल आणि तीन महिने प्रयत्न करूनही त्यात यश आलं नाही, तर गर्भधारणेची शक्यता फक्त 12 टक्क्यांच्या आसपास असते. यासोबतच गर्भपात आणि अनुवांशिक आजारांची (Genetical Problems)जोखीमदेखील असतेच. वयाच्या 35 व्या वर्षानंतर हे धोके झपाट्याने वाढतात. गर्भधारणेदरम्यान आणि बाळाला जन्म देताना अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. वयाच्या 40 वर्षांच्या आसपास महिलांच्या गर्भधारणेच्या क्षमतेत आणखीनच घट होते. त्यामुळे या वयात गर्भधारणेची शक्यता फक्त 7 टक्के असते. 3 महिने प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, तर ते अधिकच कठीण असते. वयानुसार बीजाडांची संख्या कमी होते आणि ते कमकुवत होऊ लागतात. मोठ्या वयात बीजाडांमध्ये गुणसूत्रांची (Chromosomes)समस्या निर्माण होते, त्यामुळे मुलांमध्ये जन्मजात आजारांचा धोका वाढतो. वयाच्या 40 व्या वर्षी महिला निरोगी मुलाला जन्म देऊ शकतात, परंतु त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला अधिक धोका निर्माण होतो. पुरुषांमध्येही (Male) वयानुसार मुले जन्माला घालण्याची क्षमता कमी होते. परंतु ही प्रक्रिया महिलांपेक्षा उशीरा म्हणजे 40 वर्षांच्या आसपास सुरू होते. वयाच्या 40 व्या वर्षी, पुरुषांमध्ये कमी वीर्य तयार होते आणि शुक्राणूंची संख्यादेखील कमी होते. तसेच शुक्राणूची वाहण्याची क्षमताही कमी झालेली असते. मोठ्या वयातील पुरुषांच्या शुक्राणूंमध्येदेखील अनुवांशिक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे मुलामध्ये जन्मजात रोग आणि दोष वाढण्याची शक्यता वाढते. स्त्री जोडीदाराचे वय काहीही असले तरी पुरुषाला गर्भधारणेसाठी पूरक शुक्राणू देण्याकरता अधिक वेळ लागू शकतो. अधिक वेळा प्रयत्न करावे लागतात तसंच स्त्रियांमध्ये गर्भपाताचा (Miscarriage) धोका अधिक वाढतो. याचा अर्थ असा नाही की वयाच्या 40 व्या वर्षी पुरुष बाप बनू शकत नाही, मात्र यात जोखीम अधिक असते.
    First published:

    Tags: India, Marriage, Pregnancy

    पुढील बातम्या