अरे देवा! हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हर Ice Cream; आता हेच बाकी राहिलं होतं

अरे देवा! हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हर Ice Cream; आता हेच बाकी राहिलं होतं

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही आइस्क्रिम पाहिल्यानंतर नेटिझन्सनी अशा प्रतिक्रिया दिल्यात.

  • Share this:

मुंबई, 24 जून : आइस्क्रिम (Ice Cream) म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. ज्याला आइस्क्रिम आवडत नाही अशी व्यक्ती क्वचितच असावा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आइस्क्रिम आवडतंच. कुणाला चॉकलेट, कुणाला बटरस्कॉच, कुणाला व्हॅनिला प्रत्येकाची पसंत वेगळी. मात्र तुम्ही हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हरचं आइस्क्रिम चाखलं आहे का?

कर्नाटकातल्या डेरी डे या कंपनीने हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हरचं आइस्क्रिम लाँच केलं आहे. औषधी गुणधर्म असलेली हळद भारतातील मसाल्याचा एक भाग आहे, तर च्यवनप्रशा हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आयुर्वेदिक सप्लिमेंट आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांचा वापर करून आथा आइस्क्रिमही तयार करण्यात आलं आहे.

हलदी फ्लेव्हर आइस्क्रिममध्ये हळद, काळी मिरी आणि मध आहे. कर च्यवनप्राश फ्लेव्हर आइस्क्रिममध्ये इतर जिन्नसांसह खजूर टाकण्यात आलेत.

हे वाचा -  WORLD AFTER CORONA - कोरोना लॉकडाऊननंतर कसं बदललं आयुष्य; पाहा एका क्लिकवर

पोर्टनुसार डेरी चे सह संस्थापक यांनी सांगितलं, आइस्क्रिम इंडस्ट्रीत पहिल्यांदाच हळदीचा वापर करण्यात आला आहे.

मात्र या नव्या फ्लेव्हर्सची आइस्क्रिम ग्राहकांच्या पसंतीस पडणार नाही असंच दिसचं आहे. कारण सोशल मीडियावर या आइस्क्रिमबाबत अशा काही प्रतिक्रिया उमटू लागल्यात.

कोरोनाच्या परिस्थितीत आइस्क्रिम इंडस्ट्रिलाही फटका बसला आहे. उन्हाळ्याचा कालावधी म्हणजे आइस्क्रिमला भरपूर मागणी असते. मात्र रिपोर्टनुसार यंदा मार्च आणि जूनमधील आइस्क्रिमचा व्यवसाय घटला आहे. या कालावधीत वर्षातील 40-50 टक्के विक्री होते. या वर्षी जवळपास चार ते पाच हजार कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: June 24, 2020, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading