नवी दिल्ली, 25 जून : आपल्या लहानपणापासून आपण फेअर अँड लव्हलीची (Fair & Lovely) जाहिरात पाहत आलो आहोत. आपल्या घरातही कुणी ना कुणी तरी ही क्रिम वापरतंच. फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्याही सर्वाधिक पसंतीचं असलेला हा ब्रँड. मात्र आता याचं नाव बदलणार आहे. फेअर अँड लव्हलीमधील फेअर गायब होणार आहे. 1975 साली म्हणजे 45 वर्षांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरने (Hindustan Unilever) एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच केली होती. मात्र फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे. त्यामुळे कंपनीवर अनेकदा रंगभेद करत असल्याची, गोरेपणाच्या आकर्षणाचा व्यापार करत असल्याची टीकाही झाली. त्यामुळे आता आपल्या या ब्रँडचं नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. लवकरच यातून फेअर हा शब्द काढला जाणार आणि नवं नाव दिलं जाणार आहे.
We’re committed to a skin care portfolio that's inclusive of all skin tones, celebrating the diversity of beauty. That’s why we’re removing the words ‘fairness’, ‘whitening’ & ‘lightening’ from products, and changing the Fair & Lovely brand name.https://t.co/W3tHn6dHqE
— Unilever (@Unilever) June 25, 2020
याआधी रॉयटर्सनेही सांगितलं होतं, की दक्षिण आशियातील युनिलिव्हर स्किन लाइटनिंग क्रिमच्या मार्केटिंगमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. कारण गोरं करणाऱ्या क्रिमचा सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणीही विरोध केला जातो आहे. हे वाचा - काजल अग्रवालने शेअर केले बिकिनी PHOTOS, लोकांनी केल्या अश्लील कमेंट्स सौंदर्य फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणापुरतंच मर्यादित नाही. त्यामुळे फेअरनेस, व्हाइटनिंग, लाइटनिंग असे शब्दच हिंदुस्थान लिव्हरच्या स्कीन केअर उत्पादनांमध्ये नसणार आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे. म्हणूनच यापुढे फेअर अँड लव्हलीमधील फेअर हा शब्द वगळला जाणार आहे. या फेअरनेस क्रीमचं नवं नाव काय असेल ते संबंधित नियंत्रकांच्या परवानगीनंतर निश्चित होईल. नवा ब्रँड वेगवेगळ्या स्किन टोनच्या महिलांवर केंद्रीत असेल, असं कंपनीने सांगितलं आहे. संपादन - प्रिया लाड