'Mission Majnu' मधून रश्मिका मंदानाची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; आहे तरी कोण ही साऊथ क्वीन?

'Mission Majnu' मधून रश्मिका मंदानाची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; आहे तरी कोण ही साऊथ क्वीन?

दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राही (Sidharth Malhotra) झळकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर: दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह (Sidharth Malhotra) 'मिशन मजनू' (Mission Majnu) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक नुकताच समोर आला असून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्याबरोबर रश्मिका आपला बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार असून परवीज शेख, असीम अरोरा आणि सुमित बथेजा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला हे करणार असून त्यांच्याबरोबर अमर बुटाला आणि गरिमा मेहता हे देखील निर्माते आहेत.

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन 'मिशन मजनू' (Mission Majnu) हा चित्रपट तयार करणार आहे. 1970 मधील भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईवर हा चित्रपट आधारित असून फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. याविषयी बोलताना रश्मिका (Rashmika Mandanna) म्हणाली,  'मला विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे, याचा मला खूप आनंद आहे. पुढे म्हणाली की, या चित्रपटाची कथा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे की, त्यांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक होते. हिंदी चित्रपटसृष्टीत माझा प्रवास सुरू झाल्याने आणि नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे असंदेखील तिने म्हटलं. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याची माहिती चाहत्यांना देण्याबरोबरच सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) फर्स्ट लूक देखील शेअर केला आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना रॉनी स्क्रूवाला यांनी आम्ही भारताच्या पडद्यामागील हिरोंना या चित्रपटाच्या माध्यमातून सलाम करत आहोत. आपण सुरक्षित राहावे म्हणून अनेक सैनिकांनी आपला जीव पणाला लावला आहे. याआधी अनेक मोहिमांमध्ये आपल्या सैनिकांनी आपलं बलिदान देऊन देशाचे सरंक्षण केलं. या चित्रपटातून आपण त्यांची कहाणी सर्वांसमोर आणणार आहे. त्यामुळे ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले अशी या चित्रपटाची कथा प्रेक्षकांसमोर आणण्यास उत्सुक असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं. निर्माते मेहता आणि बुटाला यांनी या कथेवर तीन वर्ष काम केलं आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचेदेखील याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) याने याआधी एक व्हिलन, हँसी तो फसी, स्टुडंट ऑफ द इअर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदानादेखील खूप प्रसिद्ध असून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती खूप प्रसिद्ध असून तिचा गीता गोविंदम हा चित्रपट खूप गाजला होता.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 24, 2020, 7:16 PM IST

ताज्या बातम्या