Home /News /lifestyle /

अभिनेत्री भाग्यश्रीसाठी मटार आहेत ‘प्रोटीन रत्न', या कारणामुळे तुम्ही देखील रोज खा हे हिरवे दाणे

अभिनेत्री भाग्यश्रीसाठी मटार आहेत ‘प्रोटीन रत्न', या कारणामुळे तुम्ही देखील रोज खा हे हिरवे दाणे

अभिनेत्री भाग्यश्रीने (Actress Bhagyashree) आहारामध्ये मटारच्या दाण्यांचा समावेश करण्यास सांगितलं आहे. मटार प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहेच शिवाय यात अनेक व्हिटॅमिन्सही आहेत.

  नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : अभिनेत्री भाग्यश्री वर्काऊट बरोबर आपल्या फ्रॅन्ससाठी काही टिप्स(Tips)देखील शेअर करत असते. तिच्या व्हीडियोंना (Video) जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्री भाग्यश्री नेहमीच योगासनाचे व्हिडिओ, कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवर(Instagram page) शेअर करत असते. भाग्यश्री तिच्या फिटनेस आणि सौंदर्यची(fitness & Beauty)विशेष काळजी घेते. त्यामुळेच ती 52 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सुंदर दिसण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी ती होम रेमेडीज (Home Remedies) वापरते. सोशल मीडियावर(Social Mediea) अ‍ॅक्टिव्ह असणारी भाग्यश्री वेळोवेळी तिच्या चाहत्यांसोबत तिचे ब्युटी सीक्रेट्स (Beauty secrets) शेअर करत असते. आता तिने मटारचे फायदे सांगणारा एक व्हीडिओ इन्टाग्रामवर(Instagram Video)शेअर केला आहे. वाढत्या वयातही फिट रहायचं असेल तर, आपल्या आहारात मटारच्या दाण्यांचा समावेश करा असं तिने सांगितलंय. भाग्यश्रीच्यामेत मटार हा प्रोटीनचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे. तिने मटारला प्रोटीनचं आकर्षक रत्न म्हटलं आहे. मटारचं महत्त्व सांगणाऱ्या व्हिडिओत भाग्यश्रीने त्यामध्ये असणाऱ्या घटकांची माहितीही दिलेली आहे. (इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई) भाग्यश्रीने व्हिडिओ शेअर करताना त्यावर एक सुंदर कॅप्शन लिहिलेला आहे. ती सांगते की, ‘आता हळूहळू मटारला शहाकारी आहारामध्ये मोठा प्रोटीनचा मोठा स्त्रोत म्हणून मान्यता मिळत आहे. लहानपणी आपली आई नेहमीच आपल्याला ताटातले मटारचे दाणे संपवायला सांगायची कारण मटर हे पोषक रत्न आहे’. मटारमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि अ‍ॅन्टीइम्फ्लामेट्री गुण भरपूर प्रमाणात आहेत. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक आहेत. याशिवाय व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फायबर, स्टार्च आणि प्रोटीन असे पोषक घटक आहेत. मटार झिंक, व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, केचा मोठा स्त्रोत आहे. (हाडांचा चुरा की केमिकल नेमकं काय घालतात टूथपेस्टमध्ये? शंका दूर करण्यासाठी वाचाच) यामध्ये असणारे सगळे व्हिटॅमिन, झिंग, पोटॅशियम आणि फायबर आरोग्यासाठी आवश्यक असतात. मटार खाल्ल्यामुळे पचन व्यवस्था चांगली राहते. नजर तीक्ष्ण होते. इम्युनिटी वाढते. यामध्ये फायबर असल्यामुळे गूड बॅक्टरिया वाढून पचन व्यवस्था चांगली होते. त्यामुळे बद्धकोष्ठते सारखा त्रास होत नाही. मटारचं ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. रक्तातली साखर कमी करण्यासाठी मटार खावा.
  मटार मधलीच फ्लेवेनॉईड्स, अल्फा कॅरोटीन आणि बीटा कॅरोटीनमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. यातील फायटोन्युट्रीयन्टस पोटाच्या कॅन्सर सारख्या आजारापासून वाचवतात. मटार मधील मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे खनिज हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. सांधेदुखीचा त्रास कमी होतो. यामधील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे स्ट्रेन्थ वाढते. यामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Actress, Bollywood actress, Instagram post, Lifestyle

  पुढील बातम्या