Chanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास

Chanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिनुसार माणसाला काही गोष्टींचा हव्यास कायम असतो.

  • Share this:

दिल्ली,17 जून : चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. अनेक वर्षांनंतर देखील चाणक्यनीति आयुष्यामध्ये उपयोगी येणारी ठरते.

(Chanakya Niti: ‘या’ 5 गोष्टी आहेत आर्थिक संकटाचे संकेत)

आचार्य चाणक्य यांच्या नीति शास्त्राच्या ग्रंथांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. चाणक्यनीति आयुष्यातल्या चढउतारामध्ये उपयोगी ठरते. आचार्य चाणक्य म्हणतात आयुष्याला मोहपाशात अडकवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींपासून वेळीच दूर होणं योग्य असतं. मात्र माणसाला हाच मोह सुटत नाही आणि म्हणून माणूस दुःखी राहतो. जाणून घेऊयात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या माणसांमध्ये लालसा निर्माण करणाऱ्या 3 गोष्टी.

धन

आचार्य चाणक्य म्हणतात माणसाकडे कितीही पैसा असला तरी त्याचं मन कधीच भरत नाही. अधिक पैसा असून देखील आणखीन कमावण्याची इच्छा माणसाच्या मनात कायम असते. माणसाच्या मनातली संपत्ती आणि पैशांची लालसा त्याला वाईट मार्गावर घेऊन जाते आणि माणूस अशा दलदलीमध्ये अडकतो की त्यातून बाहेर येणं कठीण होतं. म्हणून जास्त संपत्तीच्या मागे धावण्यापेक्षा आहे त्यातच समाधान मानायला शिकलं पाहिजे.

(पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात?; दोष तुमचा नाही, राशीचा आहे हा प्रभाव)

आयुष्य जगण्याची इच्छा

जन्माला आलेला माणून एक ना एक दिवस मरणारच असतो. मात्र, खुप वर्षे जगण्याची प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा असते. कितीही आयुष्य जगलं तरी देखील माणसाला मरणाची भीती वाटते. कितीही आजार मागे लागले तरी माणूस जगण्याची इच्छा मनात धरून ठेवतो. त्याउलट आचार्य चाणक्य सांगतात की, माणसाने खुप मोठं आयुष्य जगण्यापेक्षा चांगल आयुष्य जगण्याचा विचार करावा.

(Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत)

आहार

चाणक्य नीतिनुसार माणसाने नेहमीच संतुलित आहार करायला हवा. शरीराला आवश्यक असणारा आणि तेवढाच आहार घ्यावा. मात्र, एखाद्या पदार्थाची चव आवडली तर, माणूस हव्यासाने तो पदार्थ जास्त खातो. पोटात जास्त अन्न गेलं तर, ते शरीराला नुकसानदायक ठरतं त्यामुळे कमी खावं मात्र समाधानाने खावं.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

Published by: News18 Desk
First published: June 18, 2021, 6:40 AM IST

ताज्या बातम्या