जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chanakya Niti : फसवे मित्र घालतील खड्ड्यात; म्हणून मैत्री करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Niti : फसवे मित्र घालतील खड्ड्यात; म्हणून मैत्री करताना या गोष्टी लक्षात ठेवा

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिनुसार (Niti) फसव्या आणि गोड बोलणाऱ्या मित्रांपासूनन दूर रहावं.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 28 जून : चाणक्य **(**Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य **(**Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य **(**Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये **(Difficult Time)**व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी **(Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)**येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही **(peaceful life)**जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. ( अरे बापरे! मृत बायकोच्या मोबाईल नंबरवरून आला मेसेज; पाहूनच हडबडला नवरा ) चाणक्य नीति सांगते की,आयुष्यामध्ये चांगला मित्र मिळणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना चांगले मित्र असतात त्यांची प्रगती नेहमीच होत राहते. मात्र जेव्हा चुकीचे आणि फसवे मित्र मिळतात. त्या वेळेस मात्र आयुष्यात संकटं यायला लागतात. म्हणून मित्र बनवताना सावध रहावं. चाणक्य सांगतात मैत्री मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायला हवा. ( राशीभविष्य: कन्या आणि तुला राशीने घरातल्या सदस्यांची काळजी घ्यावी ) दृध मैत्री आचार्य सांगतात सुख-दुःखामध्ये साथ देतात तेच खरे मित्र असतात. संकटाच्या काळामध्ये खऱ्या मित्रांची ओळख होते. वाईट परिस्थिती आल्यानंतर सगळेजण आपली साथ सोडतात. मात्र खरा मित्र वाईट काळात देखील आपल्या सोबत राहतो. मैत्री करताना या गोष्टी लक्षात ठेवा आपण चुकीच्या गोष्टी करत असताना चांगला मित्र आपल्याला अडवतो. चाणक्यनीती नुसार मित्र जेव्हा चुकीच्या गोष्टी करतो त्यावेळेस स्वार्थी मित्र प्रोत्साहन देतात. वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्या अशा मित्रांपासुन चारहात लांब राहायला हवं. ( ‘Black Food’चा फायदा माहिती आहे का?;आजच खायला सुरूवात करा ) मित्राला धीर देतात आचार्य चाणक्य सांगतात खरे मित्र नेहमीच आपली मैत्री मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. खरेपणा आणि इमानदारीने आपली मैत्री टिकवतात. मात्र स्वार्थी आणि लालची मित्र फक्त फायद्यासाठी आपला वापर करतात आणि त्यामुळेच मैत्री तुटते. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा खरे मित्र आपल्याला धीर देतात आणि आपली साथ देतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात