मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शरीराच्या 'या' भागांमध्ये चरबी जमा होणे धोकादायक; असू शकतो गंभीर आजाराचा धोका!

शरीराच्या 'या' भागांमध्ये चरबी जमा होणे धोकादायक; असू शकतो गंभीर आजाराचा धोका!

शरिरावरील चरबी

शरिरावरील चरबी

बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाण वाढत आहे. त्यासाठी प्रामुख्यानं वजनवाढ कारणीभूत ठरते. वजन वाढतं, तेव्हा बरेचदा शरीरातली चरबी वाढलेली असते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाण वाढत आहे. त्यासाठी प्रामुख्यानं वजनवाढ कारणीभूत ठरते. वजन वाढतं, तेव्हा बरेचदा शरीरातली चरबी वाढलेली असते. चरबी हा घटक पूर्णतः वाईट नसतो. शरीराच्या काही भागांवर चरबी साचल्यानं काही त्रास होत नाहीत. पण काही अवयवांवर चरबी साचली, तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. डायबेटिस, रक्तदाब, कर्करोग या व इतर अनेक गंभीर आजारांना ही चरबी आमंत्रण देते. ज्या तुलनेत शरीरात कॅलरी जातात, त्या तुलनेत व्यायामही केला पाहिजे. म्हणजे चरबी वाढणार नाही. शरीराच्या विविध अवयवांवर साचणाऱ्या चरबीमुळे स्त्रियांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे. ‘आज तक हिंदी’नं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

व्यायाम किंवा शारीरिक कष्ट, मेहनत नसेल, तर चरबी जमा होऊ लागते. म्हणजेच कॅलरी बर्न न होता फॅट्सच्या स्वरुपात शरीरात साचू लागतात. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील न्युट्रिशन साइंटिस्ट डॉ. सारा बेरी यांच्या मते, शरीरात साचणारी चरबी काही वेळा धोक्याची ठरू शकते. शरीरात व्हिसरल फॅट साचलं, तर ते अपायकारक रसायनांची निर्मिती करतं. त्यामुळे सूज, टाइप 2 डायबेटिस हे आजार मागे लागतात. स्त्रियांच्या शरीरावरील चरबी त्यांचं आरोग्य कसं आहे, हे दर्शवते. काही वेळेला ती चरबी साठणं अपायकारकही ठरू शकतं.

हेही वाचा -  शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी खा ‘ही’ फळं; जाणून घ्या, याचे फायदे?

ब्रेस्ट फॅट

तज्ज्ञांच्या मते, स्त्रियांच्या स्तनांचा आकार मोठा असेल, तर त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. याबाबत 2008मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार मोठे स्तन असणाऱ्या 20 मुलींमध्ये पुढच्या 10 वर्षांत डायबेटिसचा धोका वाढला. 2012मध्ये शास्त्रज्ञांनी आणखी एक अभ्यास केला. त्यानुसार स्तनांचा आकार मोठा असल्यानं व्हिसरल फॅट वाढण्याचा धोका असतो, असं त्यांच्या निदर्शनाला आलं. अशा स्त्रियांमध्ये वय, गर्भधारणा, स्तनपान, अनुवंशिकता या कारणांशिवायही कर्करोग होण्याची शक्यता असते. स्तनांच्या आकार वाढण्यासाठी अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं बीएमव्ही मेडिकल जेनेटिक्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं आहे.

पोटावरील चरबी

व्हिसरल फॅटमुळे हृदयरोग, कर्करोग, स्ट्रोक या आजारांचा धोका वाढतो. नैराश्य, डायबेटिस आणि डिमेन्शिया हेदेखील आजार यामुळे होण्याची शक्यता असते. व्हिसरल फॅट पोट व पाठीच्या खालच्या बाजूला जमा होतं. ज्या स्त्रियांच्या कंबरेचा आकार नितंबांपेक्षा मोठा असतो, त्यांना हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता जास्त असते. अशा स्त्रियांना इतर स्त्रियांच्या तुलनेत हार्ट अ‍ॅटॅकची शक्यता 10-20 टक्के जास्त असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांना आढळून आलं. कंबरेचा घेर कमी करण्यासाठी प्रथिनं अधिक व कर्बोदकं कमी घेण्याचा सल्ला दिला जातो. पोहणं, सायकल चालवणं, वेट ट्रेनिंग आणि वर्कआऊट यामुळेही कंबर कमी करता येते.

हेही वाचा -  Diabetes रुग्णांनी असा घ्यावा आहार; दुपारच्या जेवणात या 4 गोष्टी महत्त्वाच्या

हिप्स व मांड्यांवरील चरबी

‘द सन’च्या वृत्तानुसार, हिप्सवरील म्हणजे नितंबांवरील चरबी चांगली असते. तज्ज्ञांच्या मते ते चांगलं असलं, तरी स्नायूंना दाबून टाकेल, इतकी चरबी वाढू देऊ नये. सॅनफोर्डमधील फ्लोरिडा रुग्णालय आणि बर्नहॅम ट्रान्स्लेशनल रिसर्च इस्टिट्युट फॉर मेटाबॉलिझम अँड डायबेटिसच्या तज्ज्ञांनी हिप्सवरील चरबीबाबत अभ्यास केला. हिप्सवरील चरबीमुळे हृदयरोग व डायबेटिसचा धोका कमी होतो, असं मुख्य संशोधक डॉ. स्टीव्हन स्मिथ यांचं मत आहे.

गळ्यावरील चरबी

गळ्यावरील वाढलेली चरबी म्हणजे शरीरात वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असल्याचं लक्षण असतं. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, ही चरबी हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवत असल्याचं दिसून आलं. याचा श्वासनलिकेवरही दाब पडू शकतो. यामुळे स्लिप अ‍ॅपनियासारख्या समस्या भेडसावू शकतात. ही चरबी वाढल्यास हॉर्मोन्सचा समतोल बिघडू शकतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचं प्रमाण कमी होऊ शकतं.

आहाराच्या अनियमित वेळा, आहारातले बदल व व्यायामाचा अभाव यामुळे चरबी वाढते. बहुतांशवेळा चरबी वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. त्यामुळे वेळीच ही वाढ रोखली पाहिजे व शरीर तंदुरुस्त ठेवलं पाहिजे.

First published:

Tags: Fat, Health, Lifestyle