नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना ब्लॅक फंगसचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लाईफस्टाईल बदलून आहारात बदल करून आणि मेडिकेशनने डायबेटीस कंट्रोल करता येतो. मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहाराकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. सकाळच्या आहाराबरोबर दुपारचे जेवण देखील योग्य असायला हवं. मुळात आहारामध्ये नेमकं काय घ्यावं आणि काय टाळावं हे बहुतेक मधुमेहाच्या रुग्णांना माहीत नसतं. तर जाणून घेऊ, मधुमेहाच्या रुग्णांचा दुपारचा आहार कसा असावा? आपण जे खातो त्यापासून साखर तयार होते. या साखरेपासून शरीराला उर्जा मिळते.
मधुमेहाच्या रुग्णांचे बॉडी सेल्स ग्लुकोज ऍब्जॉर्ब करत नाहीत आणि त्यामुळे साखर रक्तात मिसळते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसभराच्या आहाराचे नियोजन करायला हवे. उठल्यानंतर, सकाळी मधल्या वेळेत आणि त्यानंतर दुपारी आहार कसा असेल हे निश्चित करावं. संध्याकाळी आणि रात्रीचं जेवण देखील ठरवावं. आहार नियंत्रणात ठेवल्यास शुगर लेवल कंट्रोल होण्यास मदत होते.
तांदूळ आणि डाळ
मधुमेह झाल्यावर लोक तांदूळ खाणं बंद करतात. मात्र, तांदूळ पूर्ण बंद करण्याऐवजी प्रामाणात खाण्यचा सल्ला डॉक्टर देतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कधीकधी अचानक साखरेची पातळी वाढू लागते. अशा वेळेस दुपारच्या आहारामध्ये डाळीचं सेवन करावं डाळीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. याशिवाय तांदळाचा वापर करता येऊ शकतो. तांदळाचा भात बनवण्यापेक्षा तांदळाची भाकरी बनवून खाल्ल्यास फायदा मिळतो. यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.
दही
दुपारच्या जेवणात डायबेटिस रुग्णांनी दही खायला हवं. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटिन असतं आणि प्री-बायोटिक्स असतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात दही नक्की खा.
हिरव्या पालेभाज्या
मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसभरातून एकदा तरी हिरव्या भाज्या खायला हव्यात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय पोषक घटकही असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ऍन्टी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल होण्यास फायदा मिळतो.
हे वाचा - चेहऱ्यावर घरगुती उपाय करताना अशी घ्या काळजी; तुमच्यावरून हटणार नाही कोणाची नजर
अंडी
हाय ब्लड शुगर पेशंटने आहारामध्ये अंड्याचा समावेश करावा. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि अमिनो ऍसिड असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा मिळतो. यासोबतच गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही अंडी मदत करतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health Tips, Tips for diabetes