मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी खा ‘ही’ फळं; जाणून घ्या, याचे फायदे?

शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी खा ‘ही’ फळं; जाणून घ्या, याचे फायदे?

प्रोटिन हा शरीरातील विविध सेल्स आणि हाडांसाठी उपयुक्त असणारा महत्त्वाचा घटक आहे.

प्रोटिन हा शरीरातील विविध सेल्स आणि हाडांसाठी उपयुक्त असणारा महत्त्वाचा घटक आहे.

प्रोटिन हा शरीरातील विविध सेल्स आणि हाडांसाठी उपयुक्त असणारा महत्त्वाचा घटक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

आपल्या आहारात फळांचा समावेश असणं फायदेशीर ठरतो. फळांमध्ये असणारी जीवनसत्त्व, पोषकद्रव्य ही शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि ऊर्जा वाढवण्याचं ही काम करतात. तसंच शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी डाळी, अंडी, सुकामेवा यासारखे पदार्थही खायला सांगितले जातात. परंतु, काही अशी फळंही आहेत, ज्यात प्रोटिनचं प्रमाण खूप आहे.

प्रोटिनमुळे शरीराची वाढ चांगली होते. खासकरून, लहान मुलं आणि वृद्धासांठी फळं खाणं हितावह ठरतं. प्रोटिन हा शरीरातील विविध सेल्स आणि हाडांसाठी उपयुक्त असणारा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी कुठली फळं खाणं तब्येतीसाठी हितावह आहे हे जाणून घेऊ. या बद्दलची माहिती देणारं वृत्त ‘एनडीटीव्ही इंडिया’ने दिलं आहे.

तब्येत उत्तम राहावी यासाठी नियमित व्यायाम, योगा, चालणं आदि गोष्टी उपयुक्त ठरतात. या शिवाय संतुलित आहार घेणंही तितकंच आवश्यक ठरतं. यासाठी नियमितपणे फळं खाणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं. केवळ प्रोटिन नाही तर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्याचं कामही फळांमुळे होतं.

ब्लॅकबेरी

एक कप कच्च्या ब्लॅकबेरींमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच शरीरातील फायबर्सची झालेली झीजही भरून निघते. कारण, ब्लॅकबेरीमध्ये प्रोटिनचं प्रमाण 8 ग्रॅम असतं. व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटसचं प्रमाणही ब्लॅकबेरीमध्ये आढळतं. यामुळे तुमची त्वचा चांगली व तजेलदार राहते.

केळी

शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात केळ्यांचा समावेश करायला हवा. कारण, केळ्यांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप असतं. एक कप केळ्यांच्या ज्युसमध्ये 1.6 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं. या शिवाय केळ्यात फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी 6 आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. केळं हे नुसतं सोलूनही खाल्लं जातं किंवा दुधात केळ घालून शिकरणही केली जाते.

हेही वाचा - कितीही पौष्टिक असली तरी 'या' लोकांनी अजिबात खाऊ नये मुगडाळ, होतो वाईट परिणाम

किवी

एक कप किवीमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं. यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं. तसंच यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाणही खूप असतं. शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठीही डाएटमध्ये किवी असणं फायद्याचं ठरतं.

पेरू

एक कप पेरूच्या ज्युसमध्ये 4.2 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे प्रमाण खूप असते. पेरू हे फळं सालासकट किंवा त्याची साल काढूनही खातात.

चेरी

एक कप चेरीमध्ये 1.6 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच यात ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपयुक्त असं पोटॅशियमही आढळतं. तसंच चेरीमध्ये अँटिऑक्सिडंटस आणि अँटिइन्फ्लेटरी गुणधर्मही विपुल प्रमाणात आढळतात. चेरीपासून तयार केलेली स्मूदी खाणं ही शरीरासाठी उपयुक्त ठरतं.

First published:

Tags: Fruit, Lifestyle