मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer - विमान प्रवासात बाळाचा जन्म झाल्यास त्याचं जन्म ठिकाण काय असतं?

Explainer - विमान प्रवासात बाळाचा जन्म झाल्यास त्याचं जन्म ठिकाण काय असतं?

ना कोणता देश, ना कोणतं, राज्य, ना हॉस्पिटल, ना घर आकाशात जन्मलेल्या बाळाचं जन्म ठिकाण नेमकं कुठलं?

ना कोणता देश, ना कोणतं, राज्य, ना हॉस्पिटल, ना घर आकाशात जन्मलेल्या बाळाचं जन्म ठिकाण नेमकं कुठलं?

ना कोणता देश, ना कोणतं, राज्य, ना हॉस्पिटल, ना घर आकाशात जन्मलेल्या बाळाचं जन्म ठिकाण नेमकं कुठलं?

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : मंगळवारी लंडनहून कोचीला (London to Kochi Flight) येत असणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिलेने बाळाला (Baby born in Air India) जन्म दिला. हे पहिलं प्रकरण नाही तर याआधीसुद्धा काही बाळांचा विमानात जन्म झाला आहे (Baby born in plane). कोणत्याही हॉस्पिटल किंवा घरात न जन्मता हे बाळ पृथ्वीपासून दूर उंचावर आकाशात जन्म घेतं. त्यावेळी त्याचं जन्म ठिकाण नेमकं काय असतं?

देशांतर्गत विमानसेवा असेल तर ठिक आहे पण आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात जर हे बाळ जन्माला आलं तर त्याला कोणत्या देशाचं नागरिकत्व (Citizenship) मिळतं, असा प्रश्न साहजिकच पडतो. त्या बाळाला नेमकं कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळेल? खरं तर भारतात सहसा सात महिने किंवा त्याहून अधिक काळ गरोदर असणाऱ्या महिलांना विमान प्रवास करण्याची परवानगी (Pregnancy and air travel rules) देण्यात येत नाही. पण, काही विशिष्ट घटनांमध्ये अशी परवानगी देण्यात येते. मग अशा वेळी बाळाची नागरिकता कशी ठरवण्यात येते?

हवाई हद्द तपासली जाते

ज्यावेळी बाळाचा जन्म होतो, त्या वेळी ते विमान कोणत्या देशाच्या हवाई हद्दीत (Airspace) होतं हे तपासण्यात येतं. तसंच बहुतांश वेळी विमान उतरल्यानंतर त्या देशामध्ये बर्थ सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्या देशाच्या विमानतळ प्रशासनाकडून यासंबंधीची कागदपत्रे मिळवता येतात.

हे वाचा - चमत्कार! कोमात असताना झालं बाळ; शुद्धीवर येताच महिलेला बसला धक्का

अर्थात, हे अनिवार्य नाही. त्या मुलाला आपले आई-वडील ज्या देशाचे रहिवासी आहेत, तेथील नागरिकता (Citizenship of baby born in plane) मिळवण्याचाही हक्क असतो.

दुहेरी नागरिकत्व

प्रत्येक देशामध्ये याबाबत असलेल्या नियमांमध्ये काही प्रमाणात फरक आहे. बऱ्याचशा देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व (Multiple citizenship) घेता येते. काही वर्षांपूर्वी ॲम्स्टरडॅमहून अमेरिकेला (Amsterdam to America flight baby born) जात असणाऱ्या एका विमानात महिलेने बाळाला जन्म दिला होता. बाळाजा जन्म झाला तेव्हा विमान अमेरिकेच्या हवाई हद्दीमध्ये होतं.

हे वाचा - Drugs घेतले तर आपल्या देशात जास्तीत जास्त काय आहे शिक्षा? फाशीचीही आहे तरतूद?

तसंच, अमेरिकेत पोहोचल्यानंतर या बाळाला आणि आईला मॅसाचुसेट्स रुग्णालयात हलवण्यात आलं. अमेरिकेच्या हद्दीत जन्मल्यामुळे या बाळाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं. तसेच, आई-वडिल नेदरलँडचे नागरिक असल्यामुळे त्याला तिथलं नागरिकत्वही मिळवता आलं.

दोन देशांपैकी एका देशाचं नागरिकत्व

अर्थात, भारतात असं होणं शक्य नाही. आपल्या देशात दुहेरी नागरिकत्व (Dual; citizenship in India) घेता येत नाही. त्यामुळे, भारतातील एखाद्या महिलेनी विमान दुसऱ्या देशाच्या हद्दीत असताना मुलाला जन्म दिला; तर त्या बाळाला भारत किंवा तो देश यापैकी एकाच देशाचं नागरिकत्व स्वीकारता येईल.

First published:

Tags: Airplane, Explainer, Lifestyle, Small baby