नवी दिल्ली, 05 जानेवारी : ग्रेटर नोएडाच्या (greater Noida) जेवर भागात राहणाऱ्या गौतम नावाच्या व्यक्तीचा एका विचित्र अपवादात्मक घटनेत मृत्यू (death) झाला आहे. आकाशातून पडलेली वीज (lightning) आणि इयरफोन (earphone) या दोन गोष्टींच्या एकत्र येण्यानं हे झालं. घडलं असं, की आकाशातून वीज कोसळली तेव्हा गौतमच्या कानात त्यानं लावलेल्या इयरफोन्सचा स्फोट (blast) झाला. त्यातून त्याचा मृत्यू ओढवला. सतत कानात इयरफोन्स लावून असणाऱ्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. रविवारच्या संध्याकाळी गौतम आपल्या शेतात फिरायला गेला होता. यादरम्यानच मोठा पाऊस (heavy rainfall) सुरू झाल्याने तो आपल्या शेतातील झोपडीत गेला. झोपडीत तो बाजेवर बसला. काही काळानंतर तिथून जात असलेल्या एका व्यक्तीनं पाहिलं ते धक्कादायक होतं. त्या प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, गौतम बाजेवर पडलेला होता. त्याच्या तोंड आणि नाकातून रक्त वाहत होतं. गौतम पूर्णतः जळाला होता. सोबतच त्यानं कानात इयरफोन लावलेला होता. हे वाचा - हृदयद्रावक! 3 दिवसापासून उपाशी होती 70 वर्षाची वृद्ध आजारी महिला आज तक च्या वृत्तानुसार तिथं असलेल्या इतर लोकांचं म्हणणं आहे, की आकाशातून वीज पडल्याने इयरफोनचा स्फोट झाला. त्यातून त्याचा मृत्यू ओढवला. पोलीस (police) या रहस्यमय मृत्यूचा तपास करत आहेत. जेवर गावाच्या पोलिसांनीही मृतदेह ताब्यात घेत त्याचं शवविच्छेदन करायला पाठवला आहे. गौतमचं नुकतंच लग्न झालं होतं. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांना मोठाच धक्का बसला आहे. गौतमचा मृत्यू नेमका कसा झाला हे जाणून घेण्यासाठी सगळे अस्वस्थ आहेत. हे वाचा - Facebook Live सुरू करुन आत्महत्या करत होता; आयर्लंडच्या हेडक्वार्टरने दिला अलर्ट गौतमचा भाऊ पुरुषोत्तम म्हणाला, गौतमचं लॉकडाऊनमध्येच सात महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. पुरुषोत्तमनं हेसुद्धा सांगितलं, की कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असून वडील राजकुमार हे मजुरी करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.