Home /News /news /

हृदयद्रावक! 3 दिवसापासून उपाशी होती 70 वर्षाची वृद्ध आजारी महिला; पोलिसांनाही फुटला मायेचा पाझर

हृदयद्रावक! 3 दिवसापासून उपाशी होती 70 वर्षाची वृद्ध आजारी महिला; पोलिसांनाही फुटला मायेचा पाझर

70 वर्षांची (70 year old)एक वृद्ध महिला (Women) एकटीच (Alone) राहत होती. ती सतत आजारी (Sick) असल्यानं तिची काळजी घ्यायला (Caretaker) घरात कोणीही नाही. त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून तिनं अन्नाचा एक कणही पोटात (Starving) घेतला नाही.

पुढे वाचा ...
    भोपाळ, 05 जानेवारी: आयुष्याचा शेवटचा टप्पा खरंच खूप संघर्षमय असतो. या काळात आपली हक्काची माणसं एक एक करुन आपल्याला सोडून जात असतात. साथ द्यायलाही कोणी उरत नाही. तेव्हा घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात मरणाची वाट पाहत खितपत पडावं लागतं. माणसाला जगण्याची आशा मरुही देत नाही. तेव्हा आयुष्याला येतं निराधार जगणं. अशीच निराधार जगण्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 70 वर्षांची एक वृद्ध महिला एकटीच राहत होती. ती सतत आजारी असल्यानं तिची काळजी घ्यायला घरात कोणीही नाही. त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून तिनं अन्नाचा एक कणही पोटात घेतला नाही. या घटनेची माहिती मिळताच इतरवेळी चोरांना आणि ठगांना आपल्या पोलीसी दणका देणाऱ्या पालिसांनाही मायेचा पाझर फुटला आहे. भोपाळ पोलिसांनी मानवतेचं उदाहरण समोर ठेवतं या महिलेला तातडीनं मदत केली आहे. प्रथम तिला रुग्णालयात दाखल करुन तिना पोटभर जेवू घातलं आहे. तसेच तिची व्यवस्थित काळजी घेता यावी म्हणून तिला वृद्धाश्रमात आश्रयही देण्यात आला आहे. अशी मिळाली मदत मिळालेल्या माहितीनुसार, ही वृद्ध महिला स्वदेश नगरच्या घर क्रमांक 29 मध्ये भाडेकरू म्हणून राहते. तिचं वय सुमारे 70 वर्ष एवढं आहे. ती सतत आजारी असते. तिनं गेल्या तीन दिवसापासून काहीही खाल्लं नाही. अशी माहिती मिळताच आशोक गार्डनचे एसआय उमेश चौहान आपल्या पथकासह आजारी महिलेच्या घरी पोहोचले. संपूर्ण टीमनं वृद्ध महिला चंद्रप्रभाच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर तिला जवळच्याच हमीदिया रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर तिथे उपचार केल्यानंतर तिला आता डिस्चार्जही देण्यात आला आहे. वृद्ध महिला 3 दिवसांपासून होती भूकेली डॉक्टरांच्या उपचारानंतर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कळालं की चंद्रप्रभाच्या घरी त्यांची देखभाल करणारं कोणीच नाहीये. आजारी असल्यानं तिनं स्वयंपाकही केला नव्हता, म्हणून 3 दिवस तिनं काहीही खाल्लं नव्हतं. सतत आजारी आणि त्यातून उपासमार यामुळं तिचा अशक्तपणा आणखीच वाढला होता. तिची ही करुण कहाणी ऐकल्यानंतर पोलिसांनी तिला पोटभर जेवू घातलं. चंद्रप्रभा या मुळच्या महाराष्ट्राच्या असल्याचं समजलं आहे. यांची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नसल्यानं त्यांची रवानगी  वृद्धाश्रमात केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या