मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

विचित्र! सँडविच खाल्ल्यामुळे महिला थेट ICU मध्ये, थोडक्यात वाचला जीव

विचित्र! सँडविच खाल्ल्यामुळे महिला थेट ICU मध्ये, थोडक्यात वाचला जीव

केवळ एक सँडवीच खाल्ल्यामुळे ( Story of a woman who is allergic to almost everything admitted in the hospital) एक महिला अक्षरशः मृत्यूच्या दरवाजात पोहोचल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 21 नोव्हेंबर: केवळ एक सँडवीच खाल्ल्यामुळे ( Story of a woman who is allergic to almost everything admitted in the hospital) एक महिला अक्षरशः मृत्यूच्या दरवाजात पोहोचल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अनेकांना अनेक प्रकारच्या (Various reasons behind allergies) ऍलर्जी असतात. अगदी साध्या धुळीपासून ते उदबत्तीच्या धुरापर्यत वेगवेगळ्या गोष्टींची माणसांना ऍलर्जी असते. या वस्तू त्यांच्या संपर्कात आल्या, की त्यांची तब्येत बिघडते. काहीजणांनी काही विशिष्ट खाद्यपदार्थांची (Allery of various things) ऍलर्जी असते, काहींना विशिष्ट वासांनी ऍलर्जी असते तर काहींना त्वचेला काही गोष्टी चिकटण्याची ऍलर्जी असते. या व्यक्ती आपल्याला ऍलर्जी असणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याची काळजी घेत असतात. मात्र लंडनमधील एका महिलेला आपल्याला नेमकी कशाची ऍलर्जी होईल, हेच कळत नाही.

सँडविच खाऊन झाली ऍलर्जी

ब्रिटनमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या मिया लॅचंबरी हिला एक सँडविच खाल्ल्यामुळे ऍलर्जी झाली. याचा तिला इतका त्रास होऊ लागला की हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. तिला अचानक श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला आणि तिच्या आतड्यांवरही परिणाम झाला.

एका चुकीची शिक्षा

26 वर्षांची मिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरत असताना तिने सहज सँडविच खाल्ले. त्यातून आपल्याला ऍलर्जी होईल, याची तिने कल्पनाही केली नव्हती. आतापर्यंत कुठल्या ना कुठल्या पदार्थामुळे तिला ऍलर्जी होतच आली आहे. नुकताच तिने अँटिबायोटिकच्या कोर्स पूर्ण करून आधीच्या आजारातून सुटका करून घेतली होती. आता पुन्हा तिला अँटिबायोटिक सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचा- रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; लोकांनी अक्षरशः पिशव्या भरून लुटले पैसे, VIDEO

वारंवार होते ऍलर्जी

मियाला सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने ऍलर्जी होत असते. दरवेळी ऍनर्जी होण्यामागे वेगवेगळी कारणं असतात. यावेळी चक्क सँडविच खाल्ल्यामुळे तिला ऍलर्जी झाली. तिच्या बॉयफ्रेंडने तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळेच तिचे प्राण वाचल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Britain, Food, Health