Prior to the news of UK variant came in, we have done roughly 5000 such genome sequences in our country across these labs: Secretary @MoHFW_INDIA @ICMRDELHI #StaySafe #IndiaWillWin #Unite2FightCorona pic.twitter.com/o4UmfmTrri — #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) December 29, 2020व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 17 बदल झाले आहेत. त्यापैकी 8 बदल खूप महत्त्वाचे आहेत. व्हायरसचा ज्या रिसेप्टरनं मानवी पेशीशी सोडला जातो तो नव्या कोरोनामध्ये अधिक मजबूत आहे, ज्यामुळे तो सहजरित्या संक्रमित होतो. नव्या कोरोना पसरण्याचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, "यूकेमध्ये गेल्या 24 तासांत 40,000 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत आणि ही इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे. ब्रिटनमधील कोरोनाचा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळेच कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. कोरोनाच्या इतर रूपापेक्षा हा व्हायरस वेगानं पसरतो आहे" हे वाचा - नवा कोरोना नवी लक्षण! झपाट्याने रुग्ण वाढण्याची भीती, नवा स्ट्रेन अधिक धोकादायक केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी सांगितलं, "कोरोनावरील सध्या उपलब्ध असलेल्या लशी यूके आणि आफ्रिकेतील नव्या कोरोनाशी लढण्यास सक्षम आहेत. या लशी नव्या कोरोनापासून संरक्षण देऊ शकत नाही असा कोणताही पुरवा नाही" "या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस. व्हायरसच्या बदलामुळे लशीच्या प्रभावावर काहीही परिणाम होणार नाही. पण त्याला थोडा वेळ लागेल. आपल्याला संयम राखावा लागेल. यावर उपचारासाठी योग्य त्या थेरेपीचा वापर करायला हवा. नाहीतर हा व्हायरस आवाक्याबाहेर जाईल", असं आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी सांगितलं. हे वाचा - अरे देवा! फक्त फुफ्फुसच पोखरलं नाही तर पाठीचा कणाही मोडला; मणक्यात घुसला कोरोना "सुरुवातीलाच या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं सोपं आहे. कदाचित भारतातही अधिक जीवघेण्या कोरोनाचं रूप येऊ शकतो. जो यापेक्षा जास्त घातक असेल", असं सांगत निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सावध केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus