Home /News /lifestyle /

अरे देवा! फक्त फुफ्फुसच पोखरलं नाही तर पाठीचा कणाही मोडला; मणक्यात घुसला कोरोना

अरे देवा! फक्त फुफ्फुसच पोखरलं नाही तर पाठीचा कणाही मोडला; मणक्यात घुसला कोरोना

कोरोनामुक्त रुग्णांच्या हाडांमध्येही इन्फेक्शन दिसून आलं आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर : कोरोनाव्हायरस (Coronavirus) फुफ्फुस (lung) अक्षरशः पोखरून काढत आहे. फुफ्फुसांमध्ये छेदही करतो आहे. त्यामुळे कोव्हिड-19 (Covid 19) मात केल्यानंतरही रुग्णांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. आता तर फक्त फुफ्फुस नव्हे तर हाडांवरही (bone) कोरोनाव्हायरस परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. ज्याप्रमाणे कोरोनानं फुफ्फुस पोखरलं त्याचप्रमाणे त्यानं आता पाठीचा कणाही (spine) मोडला आहे. फुफ्फुसाप्रमाणे मणक्यातील हाडात कोरोनानं शिरकाव गेला आहे. पाठीच्या मणक्यात गंभीर असं इन्फेक्शन झालं आहे. मुंबईत  (Mumbai) अशी प्रकरणं दिसून आली आहेत. मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या सहा वयोवृद्धांमध्ये वेगळीच समस्या दिसून आली आहे. जुहूतील नानावटी रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पाठीच्या हाडामध्ये कोरोना संक्रमणमुळे इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर चार आठवडे उपचार करण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार वसईत राहणारे 68 वर्षांते रिनोल्ड सिरवेल यांना कोरोनाची लागण झाली. सप्टेंबरमध्ये त्यांना रुग्णालयात दाथल करण्यात आलं आहे. एक नाही तर चार वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका वेळेला त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली. दिवसातून त्यांना तीन वेळा अँटिबायोटिक्स घ्यावे लागतात. यासाठी दररोज  7000 हजार रुपये खर्च येतो. हे वाचा - नवा कोरोना नवी लक्षण! झपाट्याने रुग्ण वाढण्याची भीती, नवा स्ट्रेन अधिक धोकादायक रिनोल्ड यांचा मुलगा विनीतनं सांगितलं, त्याचे वडील कधीच आजारी पडायचे नाहीत. कोरोना संक्रमण होण्याआधी ते दररोज 10 किमी पायी चालायचे. 10 दिवस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांना रेमडेसिवीर देण्यात आलं. बरं होऊन घरी परतल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पाठीच्या कण्यात वेदना होऊ लागल्या. दोन महिने ते डॉक्टरांकडे जात होते. त्यांच्यावर स्पाइन ट्युबरकुलोसिसचा उपचार सुरू आहेत. हे वाचा - भारतात शिरला नवा कोरोना, ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह रुग्णालयाचे स्पाइन सर्जन डॉ. मिहिर बापट यांनी सांगितलं, या रुग्णांवर काही आठवडे कोरोनाव्हायरसवर उपचार झाले. त्यांच्यामध्ये गंभीर स्वरूपाचं संक्रमण होतं. याचदरम्यान त्यांच्या पाठीच्या मणक्याचंही ऑपरेशन करावं लागलं. त्यांना आता अँटिबायोटिक्स देण्यात आले आहेत. त्यांना बरं होण्यासाठी जवळपास तीन महिने लागतील.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या