मुंबई, 6 एप्रिल : आपलं घर सजवण्यासाठी आपण खूप वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करत असतो. प्रत्येक जण नवनवीन शोभेच्या वस्तू घरात आणतो. घराचं इंटीरिअर (Interior) बदलणं किंवा फर्निचर (Furniture) घेणं अशा अनेक गोष्टी लोक करत असतात; मात्र या सर्वांसोबत आपलं किचनदेखील तितकंच सुंदर दिसावं अशी सर्वांचीच इच्छा असते. यासाठी अनेक जण किचनमधली आपल्या भांड्यांची जागा बदलतात. किचनमध्ये रचलेली भांडी सुंदर कशी दिसतील याचा प्रयत्न करतात. अशा वेळी अनेकदा किचनमधले ग्लासेस कॅबिनेटमध्ये आकर्षक दिसावेत यासाठी ते उलटे (Glasses Upside Down) ठेवले जातात; मात्र काही एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार घरातले ग्लासेस अशा प्रकारे ठेवल्याने त्याचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होऊ शकतं. TikTok वर एक किचन हॅक (Kitchen Hack) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. @Bs.hidden.secrets नावाच्या अकाउंटवरून या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. किचनमध्ये ग्लास उलटे ठेवल्याने काय काय नुकसान होऊ शकतं हे या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 3.6 मिलियन युझर्सनी पाहिला आहे आणि लाखो युझर्सना हे लेटेस्ट इंटरनेट हॅक प्रचंड आवडलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालादेखील तो नक्की आवडू शकतो. मुंबईत आढळलेल्या भारतातील पहिल्या XE Variant Patient काय आहे अवस्था? ग्लास उलटा ठेवल्याने काय होतं नुकसान? ग्लास उलटा ठेवला तर त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं, हा अगदी रास्त प्रश्न आहे. व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे, की जेव्हा ग्लास उलटा ठेवला जातो तेव्हा त्याचं सर्व वजन ग्लासच्या रिमवर म्हणजेच ग्लासच्या कडेच्या गोल भागावर असतं. त्यामुळे ग्लास लवकर फुटण्याची शक्यता असते. ग्लास जास्त काळ असेच ठेवले गेले तर ते फुटण्याची शक्यता आणखी वाढत जाते. Mirror च्या रिपोर्टनुसार, हे 30 लाखापेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे; मात्र प्रत्येकजण याच्याशी सहमत आहेच असं नाही. या व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांना तो आवडलादेखील आहे; मात्र काही जणांचं म्हणणं आहे, की हा हॅक खरा वाटत नाही. एक युझर तर हेदेखील म्हणाला, की तुम्हाला मजबूत ग्लास खरेदी करण्याची गरज आहे. आणखी एक युझर म्हणाला, की 50 वर्षांत कधीच त्यांचे ग्लास फुटले नाहीत. त्याचप्रमाणे Clare Langan या ग्लासवेअर बनवणाऱ्या कंपनीने marthastewart.com शी बातचीत केली असता असं सांगितलं, की ग्लास ठेवण्याची कोणतीही पद्धत योग्य किंवा अयोग्य नसते, आपलं किचन सजवण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







